निया ‘या’ व्हिडीओमुळे पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडीओ

- Advertisement -
nia-sharma-got-trolled-for-sharing-a-video-of-wearing-binkin
nia-sharma-got-trolled-for-sharing-a-video-of-wearing-binkin

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून निया शर्मा ओळखली जाते. निया तिच्या बोल्ड फोटोंमुळे आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी नियाची ‘जमाई राजा २.०’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये नियाने बिकिनीमध्ये अनेक सीन दिली आहेत. तेव्हा पासून निया सोशल मीडियावर तिचे बिकिनीमधील फोटो किंवा व्हिडीओ नेहमीच शेअर करताना दिसते. नुकताच नियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे नियाला पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

नियाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. नियाचा हा व्हिडीओ ‘जमाई राजा २.०’ या वेब सीरिजच्या शूट दरम्यानचा असल्याचे सांगितले जातं आहे. या व्हिडीओत निया समुद्रकिनाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. तर नियाने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केली आहे. या व्हिडीओत अमेरिकन गायिका लाना देल रेचे ‘१३ बिचेस’ हे गाणं सुरू आहे. ‘१३ बिचेस’ हे कॅप्शन नियाने त्या व्हिडीओला दिले आहे. नियाचा हा व्हिडीओला ८२ हजार पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.

- Advertisement -
हेही वाचा: ‘सायना’चा टीझर रिलीज, सायनाच्या खेळाची आठवण

अनेकांनी या व्हिडीओला पसंती दिली आहे. तर अनेकांनी नियाला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला की “एकदम बकवास”, दुसरा नेटकरी म्हणाला की “एवढ काय फेमस होण्याची इच्छा आहे की अंगावर कपडे सुद्धा घ्यायला विसरलीस”, तर तिसरा म्हणाला, “घाणेरडी मुलगी” अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत नेटकऱ्यांनी नियाला ट्रोल केले आहे.

ट्रोल्स बद्ल एका मुलाखतीत निया म्हणाली होती की “मी स्वत: वर अनेक प्रयोग करते. काहींना मी परिधान केलेले कपडे आवडत नाही म्हणून ते मला ट्रोल करतात. मात्र त्यांना माझे कपडे आवडत नाहीत म्हणून मी तसे कपडे घालायचं बंद करणार नाही.”

- Advertisement -