बालदिनाला सैफकडून चिमुकल्या तैमूरला १.३० कोटी रुपयांचं गिफ्ट!

- Advertisement -

आपल्या क्युटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या तैमूरला त्याच्या पहिल्या बालदिनाला असं गिफ्ट मिळालं आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हे गिफ्ट त्याचे वडील सैफ अली खानने दिलं आहे, ज्याची किंमत सुमारे १.३० कोटी रुपये आहे.

नुकतंच सैफ अली खान एसआरटीची एक लाल रंगाची कार खरेदी करताना दिसला होता. याबाबत त्याला विचारलं असता तो म्हणाला की, “या कारमध्ये एक बेबी सीट आहे. तैमूरला यात बसवून फिरायला घेऊन जाण्याचा विचार करत आहे.”

“इतकंच नाही तर बालदिनाच्या निमित्ताने तैमूरला गिफ्ट देण्याचा विचार करत आहे,” असंही सैफने सांगितलं. “ही कार खरेदी केल्याने मी फारच आनंदी आहे. ही कार मी तैमूरसाठी ठेवणार आहे. तसंही बाळांसाठी अतिरिक्त सुरक्षेची गरज असते आणि यात बेबी सीटही आहे. तैमूरला कारचा रंग आवडेल, अशी अपेक्षा आहे,” असं सैफ म्हणाला.

- Advertisement -

दरम्यान, पुढील महिन्यात 20 डिसेंबरला करीना कपूर आणि सैफ अली खानचा लाडका तैमूर एक वर्षांचा होणार आहे. त्याच्या वाढदिवसाची तयारी जोरदार सुरु आहे.

- Advertisement -