Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमनोरंजन'ठाकरे' चित्रपटाच्या इंग्रजी पोस्टवरुन राजकारण!

‘ठाकरे’ चित्रपटाच्या इंग्रजी पोस्टवरुन राजकारण!

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर येऊ घातलेल्या ठाकरेया चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाच्या इंग्रजी भाषेतील पोस्टरला मराठी अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तशी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत ‘ठाकरे’ चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यावेळी चित्रपटाचा टीझर व पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आलं. ते पाहून अनेकांच्या मनात चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली असतानाच तरडे यांनी मराठीचा मुद्दा उपस्थित केला आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाचं इंग्रजी पोस्टर फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी आपल्या संतप्त भावना मांडल्या आहेत.
‘माझ्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचं पोस्टर मी इंग्रजीत केलं म्हणून शिवसेनेच्या काही मान्यवर नेत्यांनी मला फोन करून पोस्टर मराठीत करायला सांगितलं. मी त्यांचं ऐकलंही होतं. आता ‘ठाकरे’ चित्रपटाच्या पोस्टरचं शिवसेना काय करणार,’ असा प्रश्न प्रविण तरडे यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या या आक्षेपाला शिवसेना कसा प्रतिसाद देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ठाकरे चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. यावर त्यांनी तब्बल चार वर्षे काम केलं आहे. चित्रपटाचे निर्मातेही राऊत हेच आहेत. तर अभिजीत पानसे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments