Friday, March 29, 2024
Homeमनोरंजन'कभी ईद कभी दिवाली' मध्ये सलमान सोबत दिसणार पूजा हेगडे

‘कभी ईद कभी दिवाली’ मध्ये सलमान सोबत दिसणार पूजा हेगडे

Pooja Hegde Salman Khan,Pooja Hegde, Salman Khan,Kabhi Eid Kabhi Diwali,Pooja, Hegde, Salman, Khan,Kabhi Eid,Kabhi Diwali‘मोहनजो दाड़ो’ मध्ये ऋतिक रोशन आणि ‘हाउसफुल 4’ मध्ये अक्षय कुमारसोबत काम केल्यानंतर पूजा हेगडे आता सलमान खानसोबत दिसणार आहे. ती सलमान खान स्टारर ‘कभी ईद कभी दिवाली’ मध्ये लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून फायनल झाली आहे. याची माहिती चित्रपटाचे प्रोड्यूसर साजिद नाडियाडवालाने एका मुलाखतीमध्ये केले आहे, ज्यांनी यापूर्वी ‘हाउसफुल 4’ मध्ये तिच्यासोबत काम केले आहे.

सलमानसोबत तिची जोडी छान दिसेल – नाडियाडवाला…

नाडियाडवाला म्हणाले, “हाउसफुल 4 मध्ये पूजासोबत काम केल्यानंतर महाल वाटले की, ती या चित्रपटासाठी (कभी ईद कभी दिवाली) परफेक्ट राहील. स्क्रीनवर तिची उपस्थिती उत्तम होती आणि सलमान खानसोबत तिची जोडी खूप छान दिसेल. ती कथेमध्ये फ्रेशनेस घेऊन येईल.” रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात पूजा एका स्मॉल टाउन गर्लच्या रोलमध्ये दिसणार आहे. हा बॉलिवूडमध्ये पूजाचा तिसरा चित्रपट असेल.

ऑक्टोबरमध्ये येईल चित्रपट…

चित्रपट याचवर्षी ऑक्टोबरमध्ये फ्लोअरवर येऊ शकतो. हा अ‍ॅक्शन आणि कॉमेडीनेर भरपूर असेल. चित्रपटाची कथा साजिद नाडियाडवालाने लिहिली आहे आणि हा फरहाद सामजी दिग्दर्शित करणार आहेत. चित्रपट पुढच्यावर्षी ईदला रिलीज होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments