Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनपूनम ५६ व्या वर्षातही दिसतात तेवढ्याच सुंदर

पूनम ५६ व्या वर्षातही दिसतात तेवढ्याच सुंदर

Poonam Dhillon, Birthday, 56th yearsआपल्या अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लन यांना आजवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या आणि छोट्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ५६ वर्षीय पूनम यांचा आज वाढदिवस आहे. १८ एप्रिल १९६२ रोजी कानपूरमध्ये जन्मलेल्या पूनम यांच्या चेह-यावर वाढत्या वयाचा मुळीच प्रभाव दिसत नाही. आजही त्या पूर्वी एवढ्याच सुंदर दिसतात.

पूनम यांचा जन्म जाट कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय सेनेत इंजिनिअर आणि आई गृहिणी होत्या. चंदीगड येथे शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून पुढचे शिक्षण पूर्ण केले. पूनम यांना हिंदी सिनेसृष्टीत पहिला ब्रेक हा यश चोप्रा यांनी दिला होता. त्यांच्या ‘त्रिशुल’ या सिनेमाद्वारे पूनम यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर १९७९ मध्ये आलेल्या यश चोप्रांच्याच ‘नूरी’ या सिनेमात त्यांना लीड रोल मिळाला. या सिनेमासाठी पूनम यांना पहिल्यांदा फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments