Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजनजयललितांवर आधारीत ‘थलाइवी’चा पोस्टर प्रदर्शित

जयललितांवर आधारीत ‘थलाइवी’चा पोस्टर प्रदर्शित

Kangana Ranaut Thalaivi,Jayalalithaa,Ranaut,Kangana,Thalaivi,First Look,Posterतामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘थलाइवी’ असं या बायोपिकचं नाव असून अभिनेत्री कंगना रणौत जयललिता यांची भूमिका साकारत आहे. २६ जून २०२० रोजी हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कंगनाची बहिण रंगोली चंडेल हिने हा फर्स्ट लूक ट्विटरवर पोस्ट केला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखसुद्धा जाहीर केली आहे. जयललिता यांच्या रुपातील कंगनाचा लूक थक्क करणारा आहे. हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटासाठी कंगनाने खूप मेहनत घेतली आहे. जयललिता यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसण्यासाठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतली असून तिला प्रोस्थेटिक मेकअपचा आधार घ्यावा लागला होता. या मेकअपचे काही फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments