अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या मराठी सिनेमाचे पोस्टर रिलीज

- Advertisement -

‘एबी आणि सीडी’ या सिनेमातून बिग बी. अमिताभ बच्चन मराठीमध्ये पदार्पण करत आहेत. त्यांच्या या पहिल्या मराठी सिनेमाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. बच्चन यांच्यासारख्या मेगा स्टारने मराठीमध्ये काम करणे ही मराठी माणसासाठी निश्‍चितच आनंदाची बाब आहे. 76 वर्षीय अमिताभ बच्चन यांचा उत्साह आणि उमेद तरुणांना लाजवेल अशी आहे.

 

- Advertisement -

त्यांच्या या पहिल्या मराठी सिनेमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याबरोबर बच्चन यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळणार आहे. गणेश चतुर्थीला या सिनेमाचे पहिले पोस्टर लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आले. अमिताभ बच्चन या सिनेमात लीड रोल साकारत आहेत, तर विक्रम गोखले हे त्यांच्या मित्राचा रोल करत आहेत.

 

या दोघांच्या मैत्रीवरच सिनेमाची कथा आधारलेली असणार अहे. पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन हे “याराना’मधील “सारे जहां से अच्छा’ या गाण्यातील पोझमध्ये दिसत आहेत. मकरंद लेलेचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमामध्ये सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टांकसाळे हे देखील दिसणार आहेत.

- Advertisement -