पतीसोबत येथे एंजॉय करत आहे प्रिती झिंटा, लग्नानंतरचा तिचा पहिला फॅमिली हॉलिडे

- Advertisement -

प्रिती झिंटा सध्या पती जीन गुडइनफ आणि फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हॅकेशन एंजॉय करत आहे. प्रिती तिच्या पहिल्या फॅमिली हॉलेडसाठी अफ्रिकेत गेली आहे. अफ्रिकन सफारीचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर करताना प्रितीने लिहिले, “The start, the middle & the end of it all #lionshead #mountainchallenge #capetown #Woohoo💪 #Familyholiday.” प्रितीचा पती जीन आर्थिक विश्लेषक आहे.

प्रिती झिंटाने तिच्यापेक्षा १० वर्षे लहान अमेरिकन सिटीझन जीन गुडइनफसोबत फेब्रुवारी २०१६ रोजी लॉस एंजल्समध्ये लग्न केले होते. हा अतिशय खासगी सोहळा होता.  प्रिती आणि जीनने अतिशय गुपचूप लग्न केले होते. त्यांच्या वेडिंगचे फोटो जवळपास ६ महिन्यांनी मीडियात आले होते. अमेरिका ट्रिप दरम्यान झाली होती भेट .प्रिती आणि जीन यांची पहिली भेट काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना झाली होती.  प्रितीच्या प्रत्येक प्रोजेक्टला जीनचा पूर्ण पाठिंबा असतो. २०१५  मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान तो प्रितीसोबत दिसला होता. त्यानंतर तो अमेरिकेला परत गेला होता.लग्नाच्या फोटोंचा लिलाव प्रितीकरणार होती. प्रितीने गुपचूप लग्न केल्यानंतर लग्नाच्या फोटोंचा ती लिलाव करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. फोटोंचा लिलाव करुन त्यातून आलेले पैसे अनाथ आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा तिचा विचार होता. हॉलिवूडमध्ये लग्नाच्या फोटोंचा लिलाव करण्याची पद्धत अॅक्ट्रेस एंजेलिना जोली आणि तिचा पती ब्रॅड पीट यांनी रुजवली होती. त्यानंतर जॉर्ज क्लूनी आणि अमाल अलामुद्दीन यांनीही असेच केले होते.

नेस वाडियासोबत जोडले होते नाव  प्रिती झिंटाचे नाव भारतातील बिझनेसमॅन नेस वाडियासोबत जोडले गेले होते. दोघे बराच काळ एकमेकांना डेट करत होते.
२०१४ च्या आयपीएल मॅच दरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि ते वेगळे झाले होते.

- Advertisement -
- Advertisement -