​फोटोशूटसाठी आणखीच ‘बोल्ड’ झाली पूजा बेदीची लेक आलिया!!

- Advertisement -

शाहरूख खान, आमिर खान, अजय देवगण, श्रीदेवी, सैफ अली खान यासारख्या सुपरस्टार्सच्या ग्लॅमरस मुलींचे फोटो, त्यांच्या बातम्या सर्रास हेडलाईन्स बनतात. पण कबीर बेदीची नात आणि पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला ही स्वत:हून मीडियापासून दूर राहणे पसंत करते. आलिया अद्याप चित्रपटात दिसलेली नाही. पण बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या रांगेत बसण्यासाठी लागणारे टॅलेंट मात्र तिच्याजवळ आहे. ग्लॅमर आणि बोल्डनेसच्या बाबतीत ती कुणापेक्षाही कमी नाही. सुहाना खान, सारा अली खान, जान्हवी कपूर या सगळ्या इंडस्ट्रीच्या टॉप स्टार्स डॉटर्समध्ये आलियाचेही नाव घेतले जाते, ते म्हणूनच.

आलियाने सोशल मीडियावर कमालीची लोकप्रीय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ३ लाखांवर फॉलोवर्स आहेत.  अलीकडे आलियाने एक फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो आलियाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात आलिया कमालीची सेक्सी अन् ग्लॅमरस अवतारात दिसतेय.
कबीर बेदी यांची लेक अभिनेत्री पूजा बेदी  मोजक्या सिनेमात काम करुनही  तिच्या अदा आणि हॉट अंदाजामुळे रसिकांच्या  लक्षात राहिली आहे. पूजाची लेकही आईप्रमाणेच हॉट आहे. पूजा बेदीने १९९४ मध्ये फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले होते. २८ नोव्हेंबर १९९७ रोजी पूजाने आलियाला जन्म दिला होता. तिला एक लहान भाऊ सुद्धा आहे. २००३ मध्ये पूजा बेदीची घटस्फोट झाला.
२०११ साली सोनी इंटरनॅशनल चॅनलच्या एका रियालिटी शोमध्येही ती झळकली होती. या शोमध्ये स्पर्धक म्हणून आई पूजा बेदीसह आलियाला रसिकांनी पाहिले होते. तेव्हापासूनच आलियाच्या मादक आणि हॉट अंदावर रसिक फिदा झालेत. तिचे ते फोटो पाहून अनेकांनी तिला बॉलिवूडमध्येही पाऊल ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळेच की काय आलिया बॉलिवूडमध्ये एंट्री मारणार का याकडे नजरा लागल्या आहेत. न्यूयॉर्कमध्ये राहणारी आलिया सध्या फॅशन क्षेत्रात स्वत:ची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.  २०१४ साली आलिया  चर्चेत आली होती. पूजा बेदीची लेक असणारी आलिया आणि रामानंद सागर यांची पणती साक्षी यांच्यात एका पबमध्ये जोरदार भांडण झाले होते. यानंतर पूजाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. दुस-या बाजूला साक्षीच्या आई मीनाक्षी सागर यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर पॉस्को कायद्यानुसार पूजा बेदीला अटकही झाली होती.

- Advertisement -