Thursday, March 28, 2024
Homeमनोरंजनअमिताभ बच्चन यांनी हातावर मारला शिक्का!

अमिताभ बच्चन यांनी हातावर मारला शिक्का!

Amitabh-Bachchan CORONAमुंबई : कोरोना विषाणूचा कहर जगभरात वाढला आहे. विशेष म्हणजे राजकीय नेते, त्यांचे कुटुंबिय त्यानंतर हॉलीवूड स्टार्सही कोरोनाच्या कचाट्यात अडकले आहेत. आता बॉलिवूड स्टार्सही सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेतं आहेत.

अमिताभ बच्चन यांनी स्वतःचं पुढील काही दिवस घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर हाताचा फोटो शेअर केला. यावर महानगरपालिकेचा शिक्का उमटवलेला दिसत आहे. या शिक्क्यावर स्वतःहून घरात राहण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अर्थात ‘कोरंटाइन’ होण्याबद्दल लिहिले आहे. याचा अर्थ पुढील काही दिवस म्हणजे ३१ मार्चपर्यंत अमिताभ बच्चन त्यांच्या घरातच बंद राहणार. बिग बी यांनी चाहत्यांनाही यासंदर्भात माहिती दिली आणि स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आहे.

जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यासह अमिताभ बच्चन प्रसिद्ध गायक अनूप जलोटा यांनाही एका हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच ते लंडन दौऱ्यावरून परतले होते. वय जास्त असल्यामुळे त्यांना हॉटेलच्या एका रूममध्ये वैद्यकिय देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सोनम कपूरने घरात कोंडून घेतले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments