आता ‘रुही’ 11 मार्चला येणार भेटीला;राजकुमार रावच्या सिनेमाचं नाव बदललं

- Advertisement -
raj-kumar-rao-janvhi-kapoor-all-set-for-film-ruhi-release

raj-kumar-rao-janvhi-kapoor-all-set-for-film-ruhi-release

‘स्त्री’ सिनेमानंतर राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा ‘रुही’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 11 मार्चला ‘रुही’ सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र या सिनेमाच्या नावात बदल करण्यात आला आहे. ‘रुही-आफजा’ असं या सिनेमाचं नाव यापूर्वी ठरवण्यात आलं होतं. आता ‘रुही’ असं या सिनेमाचं नावं बदलण्यात आलं आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 16 फेब्रुवारीला ‘रुही’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

कॉमेडीचा तडका देण्यासाठी रुही’ सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसोबत वरुण शर्मा झळकणार आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना यांची महत्वाची भूमिका आहे.

हार्दिक मेहता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. “भूतिया शादी में आपका स्वागत है” असं कॅप्शन देत ‘रुही’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. राजकुमार रावचा हा दुसरा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे.

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

- Advertisement -