राखी झाली ‘नागिन’, सोशल मीडियावर व्यक्त केली इच्छा

- Advertisement -
rakhi-swanat-wants-to-play-the-role-of-shridevi-in-nagin-movie-remake
rakhi-swanat-wants-to-play-the-role-of-shridevi-in-nagin-movie-remake

राखी सावंत आणि कॉन्ट्रोवर्सी हे समीकरण काही नवीन नाही. ती कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे, फोटोजमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरूनही ती आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत असते. आताही ती चर्चेत आली आहे तिच्या एका व्हिडिओमुळे. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या ‘नागिन’ चित्रपटातल्या वेशात राखी दिसत आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अभिनेत्री श्रीदेवी यांच्या ‘नागिन’ या चित्रपटातल्या ‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्या गाण्याच्या मूळ व्हिडिओमधला श्रीदेवीचा चेहरा काढून तिने आपला चेहरा तिथे लावला आहे.

- Advertisement -

या व्हिडिओला कॅप्शन देताना ती म्हणते, “मला श्रीदेवीजी फार आवडतात. त्यांचा नागिन हा चित्रपट माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. जर त्याचा रिमेक करायचा झाला तर कोणाचा विचार करावा? पहा आणि तुमची पसंती कमेंट्समध्ये कळवा.”

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोच्या नुकत्याच झालेल्या सीझनमध्ये राखी सावंतने सहभाग घेतला होता. यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हा सीझन संपल्यानंतर, सध्या राखी तिच्या आईच्या उपचारांमध्ये व्यस्त आहे. तिची आई कॅन्सरशी लढा देत आहे. राखीने ‘बिग बॉस’च्या घरातून 14 लाख रुपये घेऊन एक्झिट घेतली. तिच्या आईच्या उपचारासाठी तिला हे पैसे हवे असल्याचं तिने सांगितलं.

- Advertisement -