रणवीर सिंगने दिला सलमान खानला मसाज!

- Advertisement -

सलमान खान सध्या रेस3’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. गत आठवड्यातच या चित्रपटाची घोषणा झाली होती. रेमो डीसूजाच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात सलमान खान प्रथमच निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे.

सध्याची एक ताजी बातमी म्हणजे, रणवीर सिंगने  ‘रेस3’वरची हजेरी.
होय, अलीकडे रणवीर सिंग अचानक ‘रेस3’च्या सेटवर पोहोचला. या आठवड्यात दीपिका पादुकोण एकटीच ‘पद्मावती’च्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस11’मध्ये पोहोचली होती. या चित्रपटातील अन्य दोन कलाकार अर्थात रणवीर सिंग आणि शाहिद कपूर दोघेही यावेळी गैरहजर होते. कदाचित हीच कसर भरून काढण्यासाठी रणवीर थेट सलमानला भेटण्यासाठी ‘रेस3’च्या सेटवर पोहोचला.  रणवीरने अचानक सेटवर पोहोचून सलमानला सरप्राईज दिले. मग काय रणवीर आणि सलमान एकाच सेटवर म्हटल्यावर धम्माल मस्ती झाली आणि यानंतर मसाज सेशन… होय, तुम्ही बरोबर ऐकलेत. मसाज सेशन.

रणवीरने सलमानला मस्तपैकी मसाज दिला. सलमानला मसाज देत असतानाचा फोटो सोशल मडियावर व्हायरल होतो आहे.   ‘एक अ‍ॅक्टरही दुसरे अ‍ॅक्टर का स्ट्रेस समज सकता है, ’ असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. आता रणवीरच्या मसाजने सलमानचा सगळा स्ट्रेस चुटकीसरशी पळून गेला असावा, अशी अपेक्षा करूयात.
याच सेटवर रणवीरने ‘रेस3’च्या टीमसोबत फोटोही काढला. या फोटोत दिग्दर्शक रेमो डिसूजा, निर्माते रमेश तौरानी, सलमान व रणवीर असे सगळे दिसत आहे. ‘रेस3’मध्ये सलमानसोबत जॅकलिन फर्नांडिसची वर्णी लागली आहे. सोबतच बॉबी देओल, साकिब सालेम, डेजी शाह, फ्रेडी दारूवाला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्ताला चित्रपटगृहांत झळकणार आहे. रणवीरचे म्हणाल तर त्याचा ‘पद्मावती’ सध्या वादात सापडला आहे. वाद चिघळत असलेला पाहून या चित्रपटाची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -