कोरोनाच्या धास्तीने रवीनाने वापरला हा फंडा, पाहा मजेशीर व्हिडीओ

- Advertisement -
raveena-tandon-new-tips-to-be-safe-from-corona-virus-video-went-viral-
raveena-tandon-new-tips-to-be-safe-from-corona-virus-video-went-viral-

सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन नेहमी सक्रीय राहते. रवीना टंडन सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे मत सगळ्यांसमोर मांडताना दिसते. आता रवीनाने कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून वेगळाच फंडा वापरला आहे. त्याचा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

रवीनाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. रवीना स्वत: वर सॅनिटायजरचा स्प्रे करताना दिसत आहे. “मुलगी वेडी झाली आहे! मी स्वत: वर सेंटचा स्प्रे करत नाही, तर सॅनिटायझर स्प्रे करत आहे.

- Advertisement -

कोरोनापासून संरक्षण, सॅनिटायझरचे चिलखत! आजकाल शूटवर मी अशीच असते. सॅनिटायझर शॉवर्स! काय करायचं! काही वर्षांपूर्वी हे वेड्यासारखे वाटले असते! पण आजकाल हे सामान्य आहे.”

अशा आशयाचे कॅप्शन रवीनाने त्या व्हिडीओला दिले आहे. रवीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. रवीनाच्या या व्हिडीओला ५९ हजार पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.

रवीना टंडन दक्षिणात्य चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर २’ मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दक्षिणात्य सुपरस्टार यश मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातून रवीना अनेक वर्षांनंतर चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे. गेल्या वर्षी रवीना ‘नच बलिये’च्या ९ व्या पर्वाची परिक्षक होती

- Advertisement -