Thursday, March 28, 2024
Homeमनोरंजन२० वर्षांनंतर पुन्हा रिलीज होतोयं,‘टायटॅनिक’!

२० वर्षांनंतर पुन्हा रिलीज होतोयं,‘टायटॅनिक’!

१९९७ मध्ये आलेल्या टायटॅनिकहा प्रेक्षकांना प्रचंड भावलेला हॉलिवूडपट पुन्हा रिलीज होतो आहे. होय,२० वर्षांनंतर  २डी आणि ३ डीमध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. दोन दशकांपूर्वी आलेल्या टायटॅनिकने सगळीकडे धूम केली होती. सर्वाधिक लोकप्रीय आणि सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांच्या यादीत आजही हा चित्रपट आघाडीवर आहे. या चित्रपटात जॅक व रोज साकारणारा अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो आणि अभिनेत्री केट विन्सलेट या दोघांच्या जोडीची केमिस्ट्री आणि पडद्यावरचा त्यांचा रोमान्स आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. आता हा चित्रपट एका नव्या रूपात जॅक व रोजची केमिस्ट्री जिवंत करणार आहे.

रिलीजआधी ‘टायटॅनिक’चे नवा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. यात चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरून दिसत आहे. ‘टायटॅनिक’ दुस-यांदा रिलीज होत असला तरी प्रेक्षकांना आपण हा चित्रपट पहिल्यांदाच पाहतोयं, अशी अनुभूती देणारा असेल, असे कॅमरून या ट्रेलरमध्ये सांगताहेत. डॉल्बी व्हिजनसह रिलीज करण्यात येणारा हा चित्रपट केवळ अमेरिकेत पाहता येईल. येत्या १ डिसेंबरला अमेरिकेच्या एएमआर थिएटरमध्ये एक आठवडाभर चित्रपट दाखवला जाईल. अर्थात भारतातील प्रेक्षक तो ऑनलाईन  पाहू शकतील.
तूर्तास या चित्रपटाचा एक डिलीटेड सीन व्हायरल होतो आहे. तुम्हाला ठाऊक असेलच की, १४ व १५ एप्रिल १९१२ रोजी रात्री ११ वाजून ४० मिनिटाला ‘टायटॅनिक’हे जहाज बर्फाच्या एका विशाल तुकड्याला धडकले होते. यानंतर अडीच तासात या जहाजाला समुद्रात जलसमाधी मिळाली होती. या जहाजावर २२२४ प्रवासी होते. यापैकी १५०० प्रवासी मृत्यूमुखी पडले होते.सध्या व्हायरल होत असलेला हा सीन जीव वाचवण्यासाठी धडपणाºया प्रवाशांवर चित्रीत केलेला आहे. जहाजाचे बचाव दल रोजला वाचवण्यात यशस्वी ठरते. याचदरम्यान एक जोडपे त्यांची मुलगी रूथ हिला शोधत असतात. रोजचा बचावलेली पाहून हे जोडपे एका क्षणाला आनंदी होते तर दुस-याच क्षणाला तितकेच निराश. उर्वरित प्रवासीही त्यांची ती अवस्था पाहून भावूक होतात, असा हा सीन आहे. १३३३ कोटी रुपए खर्चून बनलेल्या ‘टायटॅनिक’ला ७० व्या अ‍ॅकॅडमी अवार्ड्समध्ये १४ नॉमिनेशन मिळाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments