‘भूतिया शादी में आपका स्वागत है’; रुही चा ट्रेलर प्रदर्शित

- Advertisement -
ruhi-horror-comedy-movie-trailer-out
ruhi-horror-comedy-movie-trailer-out

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव  यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

रुहीचा Ruhi ट्रेलर पाहता जान्हवी कपूर एकदम वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा हॉरर लूक पाहण्यासारखा आहे. हा ट्रेलर आतापर्यंत ५४ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला राजकुमार आणि वरुण शर्मा जान्हवीला किडनॅप करताना दिसत आहेत. त्यानंतर तिला ते जंगलात घेऊन जातात. दरम्यान जान्हवीचा अभिनय पाहण्यासारखा आहे.

- Advertisement -

‘स्त्री’ चित्रपटानंतर राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा ‘रुही’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ११ मार्चला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘रुही-आफजा’ असे ठेवण्यात आले होते. मात्र या चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला आहे. आता ‘रुही’ असे या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्ट प्रदर्शित करण्यात आले होते. “भूतिया शादी में आपका स्वागत है” असे कॅप्शन देत पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. राजकुमार रावचा हा दुसरा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. कॉमेडीचा तडका देण्यासाठी रुही’ सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसोबत वरुण शर्मा झळकणार आहे. तसेच पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना देखील चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक मेहताने केले आहे.

- Advertisement -