होम मनोरंजन सैफच्या हाती लागला बिग बजेट चित्रपट

सैफच्या हाती लागला बिग बजेट चित्रपट

27
0

काही वर्षांपासून सैफ अली खान जर हटके चित्रपटांची निवड करताना दिसला आहे. त्याच्या ‘फैंटम’, ‘रंगून’ आणि ‘कालाकांडी’सारख्या चित्रपटांकडे बघता सैफ अली खान आता पारंपारिक भूमिकेतून बाहेर निघाला असल्याचे आपल्या लक्षात येते. जरी या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारसा गल्ला जमावला नसला तरी सैफच्या अभिनयाच्या वेगळ्या छटा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या.  

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खान दिग्दर्शक लव रंजनच्यासोबत एका चित्रपटाला घेऊन चर्चेत आहे.  डीएनएला दिलेल्या इंटरव्हुमध्ये सैफने सांगितले की, मी खूप काळापासून कॉमेडी चित्रपट केला नाही. माझे मन आता प्रेक्षकांना हसवायचे आहे. मी गेल्या काही वर्षात ड्रामा आणि आर्ट चित्रपटात काम केले आहे. आता मला कॉमेडी चित्रपटात काम करायचे आहे.

सैफ अली खानला जेव्हा विचारण्यात आले की तो कोणत्या दिग्दर्शकासोबत अशा कोणत्या चित्रपटाबाबत चर्चा केली आहेस का यावर तो म्हणाला  ”होय, गेल्या काही दिवसांपासून मी लव रंजनच्या संपर्कात आहे. अजूनपर्यंत आम्ही काही फायनल केलेले नाही. हा एक कॉमेडी चित्रपट असेल, ज्यात मी वडीलांची भूमिका साकारणार आहे. रंजन आता कथेवर काम करतो आहे. याबाबत आणखीन काही आताच सांगणे खूपच घाई होईल.”

लव रंजन दिग्दर्शित ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमावला होता. त्यामुळे लव रंजन आणि सैफ अली खान मिळून बॉक्स ऑफिसवर चांगली धमाल उडवतील अशी आशा करूया.

‘कालाकांडी’हा चित्रपट सैफच्या करिअरसाठी डिजास्टर सिद्ध झाला. कालाकांडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. गेल्या काही काळापासून सैफ एक हिट चित्रपटाच्या शोधात आहे. त्यामुळे हा कॉमेडी चित्रपट सैफच्या करिअरला नवी उभारी देईल अशी त्याला अपेक्षा तर नक्की असणार.