Friday, March 29, 2024
Homeमनोरंजनआता पाकिस्तानात...‘झिंग झिंग झिंगाट’!

आता पाकिस्तानात…‘झिंग झिंग झिंगाट’!

Zingat, Sairat, Pakistan, Archi, Parshyaमुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत माईलस्टोन ठरलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटआता पाकिस्तान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. येत्या काही दिवसात होणाऱ्या या महोत्सवात बॉलिवूडमधील चित्रपटांबरोबरच सैराटया मराठी चित्रपटाची देखील निवड झाली आहे.

बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट असलेल्या ‘सैराट’ची अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. आता भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमधील प्रेक्षकांना ‘सैराट’ पाहण्याची संधी मिळणार आहे.

केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला बाहुबली देखील या चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली यांनी बाहुबलीचे स्पेशल स्क्रीनिंग होणार असल्याचे सांगितले. या महोत्सवात ‘बाहुबली’सह, ‘माय डिअर जिंदगी’, ‘आंखो देखी’, ‘हिंदी मीडियम’, ‘कडवी हवा’, ‘निल बटे सन्नाटा’, या चित्रपटांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments