Friday, March 29, 2024
Homeमनोरंजनसलमान खानचा ‘राधे’ ईदला; दोन पोस्टर रिलीज

सलमान खानचा ‘राधे’ ईदला; दोन पोस्टर रिलीज

Salman Khan Birthday,Salman, Khan, Birthdayयशराज फिल्म्सने शनिवारी सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे-यूअर मोस्ट वॉन्टेड भाई’च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा चित्रपट ईद २०२० म्हणजेच २२ मे २०२० ला रिलीज होईल. प्रोडक्शन हाऊसने याची घोषणा आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर केली. यासोबतच यशराजने चित्रपटाचे दोन फर्स्ट लूक पोस्टरदेखील जारी केले गेले.

ज्यामध्ये सलमानचा एक्शन लूक दिसत आहे. यातील एका पोस्टरमध्ये तो लेदर जॅकेट आणि जीन्स घालून गोळ्या मारताना दिसत आहे. तसेच दुसऱ्या पोस्टरमध्ये जीन्स – टीशर्टमध्ये दिसत आहे. चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करत यशराज फिल्म्सने लिहिले, ‘यशराज फिल्म्सचा वर्ल्ड वाइड रिलीज. #राधे- यूअर मोस्ट वॉन्टेड भाई इन सिनेमाज, ईद २०२०’. सांगितले जात आहे की, मार्चमध्ये रिलीज होणार असलेल्या अक्षय कुमारचा चित्रपट ‘सूर्यवंशी’ सोबत केवळ याच चित्रपटाचा टीझरदेखील जारी होऊ शकतो.

या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभुदेवा आहेत आणि सलमानसोबत हा त्यांचा तिसरा चित्रपट आहेत. यापूर्वी दोघांनी ‘वॉन्टेड’ आणि ‘दबंग ३’ मध्येदेखील काम केले आहे. चित्रपटात सलमानच्या अपोझिट दिशा पटाणी दिसणार आहे. यासोबतच रणदीप हुडा आणि जॅकी श्रॉफदेखील चित्रपटात दिसणार आहे. यशराज फिल्म्सव्यतिरिक्त सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री या चित्रपटाचे को-प्रोड्यूसर आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments