Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजनज्येष्ठ संगीतकार मोहम्मद झहूर खैय्याम काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ संगीतकार मोहम्मद झहूर खैय्याम काळाच्या पडद्याआड

   मुंबई: भारतीय संगीत जगतातील अनमोल हिरा ज्येष्ठ संगीतकार मोहम्मद झहूर खैय्याम काळाच्या पडद्याआड गेले आहेत.  ते 92 वर्षांचे होते. दीर्घकाळापासून ते फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर जुहू येथील सुजॉय रूग्णालयात उपचार सुरु होते. खय्याम यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली आणि काल त्यांची प्राणज्योत मालवली.

खय्याम भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते. पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांचे पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी असे होते. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले.

अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले. प्रारंभी खय्याम यांनी संगीतकार पं. हुस्नलाल भगतराम यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम केले. त्यांनी त्यानंतरच्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्‍नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले.

खय्याम यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट

  • हीर रांझा (हा खय्याम यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट)
  • उमराव जान
  • त्रिशूल
  • थोडीशी बेवफाई
  • बाजार

खय्याम यांचे संगीत असलेली प्रसिद्ध गाणी

  • इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों है (गीतकार-शहरयार, चित्रपट-उमराव जान)
  • कभी कभी मेरे दिल में
  • गपुची गपुची गम गम
  • जुस्तजू जिस की थी उस को तो ना पाया हम ने (गीतकार-शहरयार, चित्रपट-उमराव जान)
  • दिखाई दिए यूँ
  • दिल चीज क्या है (गीतकार-शहरयार, चित्रपट- उमराव जान)
  • परबतोंके पेडोंपर श्यामका बसेरा
  • मै पल दो पल का शायर हूँ
  • ये क्या जगह है दोस्तो, ये कौन सा दयार है (गीतकार-शहरयार, चित्रपट-उमराव जान)
  • हैं कली कली के लब पर
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments