‘पठाण’च्या सेटवरील शाहरुखचे व्हिडीओ लीक

- Advertisement -
shaharukh-khans-video-leak- pathan-shooting-in-dubai
shaharukh-khans-video-leak-
pathan-shooting-in-dubai

बॉलिवूडच्या किंग शाहरुख खान त्याचा आगामी ‘पठान’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. दुबईमध्ये ‘पठाण’ सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. या सिनेमाचं शूटिंग सुरु असताना शाहरुखच्या अ‍ॅक्शन सीनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाले आहेत.

पठाण सिनेमाच्या शूटिंगच्या या व्हिडीओत शाहरुख एका गाडीवर उभं असल्याचं दिसतंय.तसचं चालत्या गाडीवर एका स्टंटमनसोबत तो फाईट करत आहे. या गाडीच्या शेजारुन दुसरी गाडी जात असून गाडीवर असलेल्या ट्रॉलीवर कॅमेरा दिसून येतोय. किंग खानच्या काही फॅन्सनी हे व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. लीक झालेले हे व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

याआधी देखील पठाण सिनेमातील काही सीन लीक झाले होते. या व्हिडीओत शाहरुख जबरदस्त स्टंट करताना दिसून आला होता. एका ट्रकवर या अ‍ॅक्शन सीनंच शूटींग करण्यात आल्याचं दिसून आलं. तर एका व्हिडीओत सर्वाच उंच बुर्ज खलिफा इमारतीसमोर शूटिंग असल्याचं दिसून आलं.

यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. हा आनंद साजरा करणासाठी यश राज फिल्म्स ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसात शाहरुखच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. तसेच चित्रपटात शाहरुख आणि जॉन ही जोडी पाहायला मिळणार आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री दीपिका पदूकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisement -