अभिनेत्र्यांमध्ये प्लास्टिक सर्जरी करणे काही नवीन नाही. परंतु याबाबत श्रुती हसन अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी बॉडी शेमिंगविषयी उघडपणे बोलते. अलीकडेच, तिने शरीराविषयी लाज वाटणा-या लोकांसा इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून, कबूल केले की, तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे आणि त्याबद्दल बोलायला तिला लाज वाटत नाही.
इंस्टाग्रामवर श्रुतीने काय लिहिले?
श्रुतीने इंस्टाग्रामवर तिची दोन छायाचित्रे पोस्ट करताना म्हटले आहे की, “मी लोकांच्या विचारांनी वागत नाही. कधी काही जण कमेंट करतात की, मी लठ्ठ दिसते तर कधी काही जण म्हणतात की मी खूप बारीक आहे. हे फोटो तीन दिवस जुने आहेत. मला खात्री आहे की बर्याच स्त्रिया मी जे काही बोलणार आहेत त्याच्याशी सहमत असतील. बहुतेक वेळा, मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या हार्मोन्सच्या दययेवर अवलंबून असते आणि गेली अनेक वर्षे मी त्यांच्याशी सामंजस्य स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सोपे नाही. ही वेदना सोपी नाही, किंवा हे शारीरिक बदलही सोपे नाहीत, परंतु माझ्या प्रवासाबद्दल बोलणे मला अधिक सोपे झाले आहे. कोणताही प्रसिद्ध किंवा सामान्य माणूस दुसर्याचा न्याय करण्याच्या स्थितीत असतो आणि ते कधीही योग्य नाही.”
श्रुती पुढे म्हणते, ‘हे माझे आयुष्य आहे आणि हे सांगताना मला फार आनंद होत आहे की, हा माझा चेहरा आणि होय मी प्लास्टिक सर्जरी केली आहे ज्यासाठी मला अजिबात लाज वाटत नाही. मी याची जाहिरात करते? नाही मी त्याविरूद्ध आहे? नाही – मी फक्त असेच जगणे निवडले आहे. आपण आपल्या स्वतःसह आणि इतरांसह करू शकत असलेली सर्वात मोठी कृपा म्हणजे आपल्या शरीर आणि मनातील बदल स्वीकारणे सुरू करणे. प्रेम द्या आणि चिल करा.’ 34 वर्षीय श्रुतीने ‘डी-डे’, ‘रमैया वस्तावैया’, ‘गब्बर इज बॅक’, ‘वेलकम बॅक’, ‘रॉकी हँडसम’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती ‘देवी’ या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे.