Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजनश्वेता तिवारीचा हॉट, फिटनेसचा फंडा

श्वेता तिवारीचा हॉट, फिटनेसचा फंडा

Shweta Tiwari,Shweta, Tiwariअभिनेत्री श्वेता तिवारी ३९ वर्षाची झाली आहे. ती सध्या ‘मेरे डॅड की दुल्हन’ आणि वेब शो ‘हम तुम अँड देम’मध्ये झळकत आहे. या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून श्वेता बर्याेच दिवसांनी परत आली आहे. ती आधीच्या तुलनेत अधिकच फिट आणि टोन्ड दिसत आहे. यासह, ती इन्स्टाग्रामवरही खूप सक्रिय झाली आहे. अलीकडेच श्वेताने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे. श्वेता म्हणाली की, तिचे चाहते तिला सोशल मीडियावर सतत विचारतात की ती इतकी फिट कशी राहते म्हणून तिने हे पोस्ट लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

Sooo Many DMs Everyday! A question I get asked frequently is how I kick started my weight loss, after my delivery! I was at 73kgs and I desperately needed to lose that weight before starting ‘Hum Tum and Them’ in order to fit my character. I was way too occupied with my new born then to truly commit to exercising, so if I’m being honest the only thing that helped me shed the 10 kgs was @kskadakia brilliant diet, even though now it’s a combination of strenuous exercising along with my dietician’s @kskadakia recommended diet, But.. I initially dropped the 10kgs of weight solely through @kskadakia allocated plan, I really am lucky that I found her when I did because she’s truly accommodated all my cheat days into a plan that’s overall very beneficial and still very fun to devour on a day to day basis, I’m never bored of my diet, and always looking forward to my next meal and that’s key. NO!NO! This is NOT a promotional post! This is a genuine Reply to all the DMs I get!

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

श्वेताने प्रसूतीनंतर असे कमी केले वजन…

श्वेताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, मला रोज बरेच डायरेक्ट मेसेजेस येत असतात! प्रसूतीनंतर माझे वजन कसे कमी झाले, असा प्रश्न मला सतत विचारला जात आहे! माझे वजन ७३ किलो होते आणि ‘हम तुम अँड देम’च्या आधी वजन कमी करायचे होते जेणेकरून मी माझ्या पात्रात फिट होऊ शकेन. तेव्हा मी माझ्या न्यू बॉर्न बेबीच्या संगोपनामध्ये व्यस्त होते आणि मला व्यायाम करणे शक्य नव्हते. या काळात मला सर्वात चांगली मदत करणारी एक गोष्ट म्हणजे उत्कृष्ट आहार. फिटनेस एक्सपर्ट किनिता कडकिया पटेल यांनी मला डाएट प्लान दिला. त्यांनी सांगितलेल्या आहारामुळे माझे वजन १० किलोने कमी झाले. मला आनंद आहे की, त्यांनी माझा आहार चांगल्या पद्धतीने आखला ज्यामुळे मी तो करु शकले आणि त्याचा मला कंटाळाही आला नाही. मी नेहमीच माझ्या पुढच्या मैलाची वाट पाहत होतो आणि हीच सर्वात चांगली गोष्ट आहे.

१९ व्या वर्षी राजा चौधरीशी झाले पहिले लग्न…

श्वेताने वयाच्या १९ व्या वर्षी दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि चित्रपट निर्माता राजा चौधरीसोबत लव्ह मॅरेज केले होते. २००० मध्ये त्यांची मुलगी पलकचा जन्म झाला. ९ वर्षानंतर राजाच्या त्रासाला कंटाळून श्वेताने २००७ मध्ये घटस्फोटाचा खटला दाखल केला आणि ती त्याच्यापासून वेगळी राहू लागली. घटस्फोटाची प्रक्रिया बर्या च दिवसांपर्यंत चालू राहिली आणि अखेर साडेपाच वर्षांनंतर २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर, श्वेताने २०१३ मध्ये अभिनेता अभिनव कोहलीशी लग्न केले होते. पण हे लग्नही टिकू शकले नाही. अभिनव आणि श्वेताचा एक मुलगा असून त्याचे नाव रेयांश आहे. तो तीन वर्षांचा आहे. श्वेताने ‘नागीन’, ‘सजन रे झूट मत बोलो’, ‘परवरीश’, ‘बालवीर ‘आणि’ बेगूसराय ‘यासारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. श्वेता बिग बॉस सीझन -4 ची विजेती राहिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments