Friday, March 29, 2024
Homeदेशपंजाबी पॉप गायक दलेर मेहंदीला दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा!

पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदीला दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा!

Daler Mehandi, Panjabपंजाब: पतियाळा न्यायालयाने २००३ सालच्या मानव तस्करी प्रकरणात प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदीला दोषी ठरवून दोनवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेर सिंग यांच्यावर बेकायदरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप होता.

दलेर आणि त्याचा भाऊ सामान्य नागरिकांना आपल्या ट्रुपचे सदस्य असल्याचे दाखवून परदेशात पाठवायचे. अवैधरित्या अशी मानव तस्करी करण्यासाठी ते घसघशीत रक्कमही आकारायचे. मेहंदी बंधु १९९८ आणि १९९९ साली दोन ट्रुप घेऊन परदेशात गेले होते. त्यावेळी ट्रुपचे सदस्य असल्याचे दाखवून ते बेकायदरित्या दहा जणांना अमेरिकेत घेऊन गेले. बशिक्ष सिंग यांच्या तक्रारीवरुन पतियाळा पोलिसांनी २००३ साली दलेर आणि त्याचा भाऊ शमशेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या दोन भावांविरोधात घोटाळयाच्या अनेक तक्रारी समोर आल्या.

पतियाळा पोलिसांनी नवी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील दलेर मेहंदीच्या ऑफीसवर छापा मारुन कागदपत्रेही जप्त केली होती. २००६ साली पतियाळा पोलिसांनी न्यायालयात दलेर मेहंदी निर्दोष असल्याच्या दोन याचिका दाखल केल्या होत्या. पण मेहंदी बंधुविरोधात सबळ पुरावे असल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात खटला पुढे चालवण्याचा निर्णय घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments