सोनम कपूर नवऱ्यासाठी रंगली जांभळ्या रंगात

- Advertisement -

अभिनेत्री सोनम कपूर आपल्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिने तिचा प्रत्येक लूक अगदी परफेक्ट कॅरी केला आहे. आता सध्याचाच तिचा लूक पहा ना…..यातही ती खुलून दिसत आहे.

सोनम कपूर सध्या तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये एका वेगळ्याच रुपात दिसत आहे. तिने आपले केस चक्क जांभळ्या रंगात रंगवले आहेत. तिने तिचा पती आनंद अहुजासाठी हा लूक केला असल्याचंही या स्टोरीमधून सांगितलं आहे.

- Advertisement -

पण हे केस तिने खरंच रंगवले नाहीत तर हा एक इन्स्टाग्राम  फिल्टर आहे. या फिल्टरच्या मदतीने तिने हे केस जांभळ्या रंगात रंगवले आहेत. ती या स्टोरीमध्ये म्हणते, जांभळा आणि पिवळा, फक्त आनंद अहुजासाठी! यात तिच्या पाठीमागच्या भिंतीवर पिवळ्या रंगाचं चित्र असलेली एक फ्रेमही दिसून येत आहे.

गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून सोनम भारतात नाही. ती तिच्या मुंबईत राहणाऱ्या परिवाराला कायम मिस करत असते. तिने तिची बहीण रिया कपूरच्या वाढदिवसादिवशी तिच्यासाठी एक भावूक पोस्टही लिहिली होती.

कामाबद्दल बोलायचं झाल्यास, सोनमच्या ब्लाईंड या आगामी चित्रपटाचं स्कॉटलँडमध्ये चित्रीकरण सुरु आहे. तिने तिथले काही फोटोही मागे एकदा शेअर केले होते.

- Advertisement -