Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशश्रीदेवी यांच्या डोक्यावर मोठी जखम?

श्रीदेवी यांच्या डोक्यावर मोठी जखम?

मुंबई: अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचे गुढ आता आणखी वाढले असून त्याविषयीची आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एशिया नेट न्यूजचा हवाला देत टाईम्स नाऊने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दुबईचा सार्वजनिक फिर्याद विभाग फॉरेन्सिक अहवालामुळे असंतुष्ट असून त्यांनी पुन्हा एकदा सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्याची मागणी केल्याचे समोर येत आहे.

‘एशिया नेट न्यूज’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार श्रीदेवी यांच्या डोक्यावर मोठी जखम आढळली आहे. दुबई पोलिसांकडून याविषयीची कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान आता ही जखम नेमकी कधी आणि कशी झाली हाच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शवविच्छेदनादरम्यान ही जखम झाली का, की त्याआधीपासूनच ही जखम होती, बाथटबमध्ये पडण्याआधीच ही जखम झाली होती की बाथटबमध्ये पडल्यामुळे ही जखम झाली असे तर्क सध्या लावण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments