स्वरा भास्कर लग्नासाठी तयार,तिचे हे ट्वीट चर्चेत

- Advertisement -
swara-bhaskar-tweet-related-marriage-viral-on-social-media
swara-bhaskar-tweet-related-marriage-viral-on-social-media

अभिनेत्री स्वरा भास्कर ही कामयच चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर तिचे मत मांडताना दिसते. अनेकदा तिला या गोष्टीमुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येते. पण स्वरा देखील शांत बसत नाही. ती ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसते. स्वरा ही अविवाहित आहे. आता स्वराने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लग्नासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

नुकताच स्वराने ट्विटर अकाऊंटवर तिचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लग्नासाठी मुलगा हवा आहे अशा आशयाची एक पोस्ट लिहिली आहे. ‘अरेंज मॅरेजसाठी हा फोटो. या फोटोत दिसणाऱ्या मुलीला स्वयंपाक येत नाही, चहा कधी कधी चांगला करता येतो…तिच्यासोबत एक कुत्रा आहे. ती त्या कुत्र्याला तिचा मुलगा समजते.

- Advertisement -

कधी कधी तिच्या डोक्यात बंडखोरीचे विषय येतात, आंदोलनजीवी आणि देशद्रोही असल्याचा तिच्यावर आरोप आहे… चांगल्या घरची सून होण्यासाठी उत्तम मुलगी’ या आशयाचे ट्वीट स्वराने केले आहे. त्यासोबतच तिने हसण्याचे इमोजी वापरले आहेत.

स्वराने केलेले हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. स्वराचे प्रत्येक ट्वीट हे चर्चेचा विषय ठरतो.

- Advertisement -