Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजन‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ फेम अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन

‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ फेम अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन

Amitaटेलिव्हिजन विश्वात विविध मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे मंगळवारी निधन झाले. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. कुछ रंग प्यार के ऐसे भीया मालिकेत बुआची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अमिता यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. पण, फुफ्फुसं निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

अद्गाता यांनी आजवर बऱ्याच मालिकांतून उल्लेखनीय भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ‘प्रतिज्ञा’ या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. या मालिकेत त्यांनी रंगवलेली ‘दादी’ची भूमिका बरीच प्रकाशझोतात आली होती. त्याशिवाय त्यांनी ‘डोली अरमानो की’, ‘बाजीगर’मध्येही उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. १९६५-६६ मध्ये त्यांनी रंगभूमीवर काम करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात एक पोकळी निर्माण झाली असून, अनेक कलाकारांना धक्काच बसला आहे. अमिता यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांवरील मायेचे छत्र हरपल्याचे म्हणत टेलिव्हिजन सेलिब्रिटींनी दु:ख व्यक्त केले. सध्याच्या घडीला मालिका विश्वात प्रसिद्धी मिळवलेल्या अमिता यांनी १९७९ चे ९० पर्यंत दिल्ली दुरदर्शनशीही जोडल्या गेल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments