सोनम कपूर ‘या’ कारणामुळे छापणार नाही लग्नपत्रिका!

- Advertisement -

Sonam Kapoorबॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपला बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार सोनमच्या लग्नात बहिणी जान्हवी कपूर आपली आई श्रीदेवी यांच्या गाण्यावर परफॉर्म करताना दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ८ मे रोजी सोनम लग्न आनंदसोबत सात फेरे घेणार आहे. याच दरम्यान सोनमच्या लग्नाबाबत आणखीन एक माहिती मिळाली आहे ती अशी की सोनमच्या लग्नाची पत्रिका छापण्यात येणार नाही आहे.  

सोनमने कागदाचा होणार अपव्यय टाळण्यासाठी लग्नपत्रिका न छापण्याचा निर्णय घेतला आहे. सोनमने पाहुण्यांना फोन करुन आमंत्रण दिले आहे. सोनम पत्रिका न छपून एक पर्यावरण संरक्षणाचा संदेशच दिला आहे. सोनमचे लग्न वेडिंग सेरेमनी सोनमची आण्टी आणि इंटीरियर डिझायनर कविता सिंग यांच्या बॅण्डस्टॅण्डस्थित आलिशान बंगल्यात पार पडणार आहे. लग्नाचे सर्व विधी घरातच असलेल्या मंदिरात केले जाणार आहेत. पिंकविला रिपोर्टनुसार, कविता सिंगचा हा बंगला ५५ हजार स्केअर फूट परिसरात बांधण्यात आला आहे.

सोनम होणार पती आनंद आहुजा एक बिझनेसमॅन आहे. आनंद अपॅरल Bhane ब्रॅण्डचा मालक आहे. देशातील सर्वात मोठी एक्सपोर्ट कंपनी म्हणून या ब्रॅण्डकडे बघितले जाते. या कंपनीचे वार्षिक टर्नओव्हर ४५० मिलियन डॉलर आहे.

- Advertisement -

जूनमध्ये सोनमचा ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे.करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत.

- Advertisement -