Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजन'सॅल्यूट'मध्ये शाहरुखसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

‘सॅल्यूट’मध्ये शाहरुखसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

Shahrukh Khan - Fatima Sana Shaikhबऱ्याच दिवसांपासून रखडलेला शाहरुख खानचा ‘सॅल्यूट’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला अाहे. निर्माते बऱ्याच दिवसांपासून यासाठी अभिनेत्रीचा शोध घेत आहेत. अखेर फातिमा सना शेखचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. निर्मात्यांना फातिमाचे मागील काम आवडले आहे म्हणून तिला अप्रोच केले गेले. मात्र आतापर्यंत या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

व्यक्त केली होती सोबत काम करण्याची इच्छा

एका मुलाखतीत फातिमाने नुकतीच शाहरुखसाेबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणाली होती, शाहरुखसोबत असला तरी मी गोंधळून जाईल मात्र त्याच्यासोबत काम करणे आवडेल. शाहरुखसोबत काम करण्याची प्रचंड इच्छा असल्याची ती म्हणाली.

ही आहे कथा…

या चित्रपटात शाहरुख भारतीय वायुदलाचे अधिकारी राकेश शर्मा यांच्या भूमिकेत दिसणार आहे, ते एक अंतराळवीरदेखील होते. या चित्रपटात त्यांचे धाडस आणि यशाची कथा दाखवण्यात येणार आहे. याबरोबरच विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले योगदानदेखील दाखवण्यात येणार आहे.

फेब्रुवारीमध्ये काम सुरु होणार…

अंजुम राजाबली यांनी लिहिलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मथाई करणार आहेत. सिद्धार्थ रॉय कपूर आणि राेनी स्क्रूवाला मिळून निर्मिती करणार आहेत. फेब्रुवारीमध्ये यावर काम सुरू होणार आहे. याच्या मेजर शेड्यूलची शूटिंग उन्हाळ्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments