…या मालिकेचे बजेट तब्बल ५०० कोटीचे

- Advertisement -

४५० कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेल्या अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा चित्रपट ‘२.०’ सध्या फार चर्चेत आहे. पण सोनी टीव्हीवर सुरु होणारा आगामी हिस्टोरीकल टीव्ही शो पोरसची त्याहूनही जास्त चर्चा आहे. याचे कारण या शोचे मोठे बजेट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोरस हा भव्य आणि रॉयल लुकच्या मालिकेचे बजेट तब्बल ५०० कोटी आहे जो आजपर्यंत टीव्हीच्या इतिहासातील सर्वात बजेट असणारी मालिका आहे. पोसर मालिकेचा सेट गुजरातच्या उबर या गावात लावण्यात आला आहे आणि हा सेट अमित सिंह आणि वैभव जाधने डिझाईन केले आहे.
९ एकरमध्ये पसरलेला हा सेट बनवण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला आहे. शोच्या गरजेनुसार येथे ११ वेगवेगळ्या प्रकारचे सेट लावण्यात आले आहेत.  या शोचे काही हिस्स्याचे शूटिंग थायलँड, बँकॉक आणि इतर देशांत लावण्यात आले आहेत. मालिकेचे अॅक्शन सिक्वेंस थायलँड येथील अॅक्शन डायरेक्टर मुंग सांभाळत आहेत. त्यांनी हृतिक रोशनचा चित्रपट बँग-बँग मध्येही काम केले आहे.

– शोमध्ये लक्ष लालवानी, रति पांडे, मोहित अबरोल, रोहीत पुरोहीत आणि सुहानी धामकी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  मालिकेले सिद्धार्थ कुमार तिवारी यांनी स्वस्तिक प्रोडक्शनखाली बनवण्यात आले आहे. त्यांनी याअगोदर ‘शनि’ ‘महाकाली : अंत ही शुरुआत है’ यांसारखे अनेक शोज् बनवले आहेत.

- Advertisement -