असे आहेत या सेलिब्रिटींचे ‘दिवाळी प्लॅन्स’

- Advertisement -

सध्या सर्वत्र दिवाळीची जोरदार तयारी सुरू असून हा आठवडा बराच रंगतदार आणि आनंददायी असणार आहे यात शंकाच नाही. बाजारपेठांपासून, कपड्यांच्या दुकानांपर्यंत सर्वच ठिकाणी सध्या दिवाळी आणि फक्त दिवाळीचीच रंगत पाहायला मिळत आहे. अशा या वातावरणापासून कलाकार मंडळीही दूर नाहीत. विविध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री सध्या दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात व्यग्र झाले असून या उत्साही माहोलाला सुरुवात झाली आहे. सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्मा आणि शाहरुख खान यांच्या घरी दिवाळी पार्टीत बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तर निर्माता रमेश तौरानी यांनीसुद्धा नुकतच दिवाळीच्या निमित्ताने एका खास पार्टीचं आयोजन केलं. होतं.

‘सेलिब्रिटी दिवाळी बॅश’च्या या यादीत आता आणखी काही मंडळींच्या नावांचाही समावेश झाला आहे. ती नावं म्हणजे, एकता कपूर, ट्विंकल खन्ना, सोनम कपूर, शिल्पा शेट्टी कुंद्रा, आमिर खान या कलाकारांचा समावेश आहे. यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित दिवाळी पार्टीकडे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बींनी नुकताच त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे यंदा त्यांच्या घरी आयोजित केली जाणारी पार्टी खूप मोठी असेल. पण, तसं नसून, यंदा बच्चन कुटुंबीय फार दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करणार नसल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या राय बच्चन हिच्या वडिलांचं याच वर्षी निधन झाल्यामुळे त्यांच्याकडे फारशी धामधूम नसेल.

- Advertisement -
- Advertisement -