Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeमनोरंजनऐश्वर्याच्या परिधान केलेल्या लेहंग्याची किंमत ४,९२५ युरो!

ऐश्वर्याच्या परिधान केलेल्या लेहंग्याची किंमत ४,९२५ युरो!

फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. त्यातच एखादी बड्या व्यक्तीची पार्टी किंवा मोठा इव्हेंट असेल तर सेलिब्रिटी आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळतेय. बॉलिवूडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा. आरस्पानी सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी ऐश प्रसिद्ध आहे.

ऐशच्या फॅशन आणि स्टाईलचा जलवा फक्त बॉलिवूड पार्ट्या, इव्हेंट्स आणि केवळ भारतात पाहायला मिळतो असं नाही. सातासमुद्रापार कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही ऐशने आपल्या हटके फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट्ने हॉलीवुडच्या मंडळींची आणि जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत.तिच्या कान्समध्ये परिधान केलेल्या प्रिन्सेस गाऊन, हटके लिपस्टिकपासून ते एखाद्या सोहळ्यात परिधान केलेल्या आकर्षक डिझायनर ड्रेसपर्यंत प्रत्येकाचीच खास चर्चा होते.आता पुन्हा एकदा बच्चन सून आपल्या फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. नुकतंच बच्चन कुटुंबीय एका शुभकार्यात व्यस्त होते.बच्चन कुटुंबीयांच्या नात्यात एका विवाहसोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी सारं बच्चन कुटुंब एक्साईटेड होतं. खुद्द बिग बी अमिताभ हेसुद्धा या लग्नाबाबत खूप उत्साही आणि एक्साईटेड होते. या लग्न सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत.अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्नी जया, मुलगा अभिषेक, मुलगी श्वेता नंदा, अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या असे सारं बच्चन कुटुंबीय एका फ्रेममध्ये पाहायला मिळाले.
यावेळी या  सोहळ्यात  ऐशने परिधान केलेल्या खास आणि महागड्या लेहंगामुळे प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ऐश्वर्याने लाल  रंगाचा लेहंगा  परिधान केला होता. आकर्षक अशा लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये ऐश्वर्याचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळालं. तिने परिधान केलेला हा लेहंग्याची किंमत ४ हजार ९२५ युरो म्हणजेच ३ लाख ७० हजार रुपये इतकी आहे.या महागड्या लेहंग्यामधील ऐश्वर्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments