Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजन'ही' लोकप्रिय अभिनेत्री मुलींना ढकलायची देह व्यापारात?

‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री मुलींना ढकलायची देह व्यापारात?

Allison Mackवॉशिंग्टन: लोकप्रिय अभिनेत्री एलिसन मॅकला मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ती हे घृणास्पद काम करत होती, असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. एलिसनला पंचवीस लाख रुपयांच्या बाँडवर जामीन देण्यात आला असून तिला शहर सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी संस्थेच्या संचालक केथ रेनाइनर याला पोलिसांनी पूर्वीच अटक केली आहे.  एका अभिनेत्रीने टीव्ही शोमध्ये मॅकने तिलाही देह व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हटले आहे. जर मॅकवरचे आरोप सिद्ध झाले तर तिला किमान १५ वर्षांसाठी तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्यता आहे.
एलिसनवर या संस्थेच्या माध्यमातून मदत मागणाऱ्या मुलींना जबरदस्ती देह व्यापारात ढकलण्याचा गंभीर आरोप आहे. एलिसन मुलींवर जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकायची, असे आरोपही तिच्यावर करण्यात आलेले आहेत. याप्रकरणी एफबीआयने सापळा रचत केथ रेनाइनर या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. केथ याने जबाबात सांगितले, की स्त्रिया व लहान मुलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेची निर्मिती केली होती. या संस्थेच्या माध्यमातून तो आपले वाईट हेतू साध्य करत होता. या जबाबात त्याने अभिनेत्री एलिसनचेही नाव घेतले आहे. ती त्याची सहाय्यक म्हणून काम पाहायची. मदत मागण्यासाठी आलेल्या गरजूंना ते वाममार्गाला लावत होते, असे त्याने सांगितले आहे. एलिसनच्या वकिलाने सांगितले, की एलिसनवर लावण्यात आलेले आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. पोलिसांनाही तिच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळालेले नाही. त्यामुळे तिला याप्रकरणी दोषी गृहित धरल्या जाऊ शकत नाही, असे एलिसनच्या वकिलाचे म्हणणे आहे. एलिसन ही डब्ल्यूबी टीव्ही सीरिज स्मॉलविले या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने अधिकतर वेब सिरिजमध्ये काम केले आहे. या वेब सिरिजमध्ये एलिसनने बोल्डनेसच्या हद्द पार केल्या आहेत. ब्रूकलिन येथील न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. सध्या न्यायालयाने एलिसनच्या जामिनीवर स्थगिती आणली आहे. केथ रेनाइनर याला मागील महिन्यात पोलिसांनी मानवी तस्करीच्या गंभीर गुन्ह्यात अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments