Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजनकॅटरिना कैफमुळे वादात सापडू शकतो ‘टायगर जिंदा है’ !

कॅटरिना कैफमुळे वादात सापडू शकतो ‘टायगर जिंदा है’ !

‘पद्मावती’नंतर ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटासंदर्भातही वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. खरे तर सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर या चित्रपटाबद्दल भाईजानचे चाहते कमालीचे एक्साईटेड आहेत. पण चाहत्यांच्या या एक्ससाईटमेंटवर सेन्सॉर बोर्ड पाणी फेरू शकते. होय, चर्चा खरी मानाल तर या चित्रपटातील झोयाच्या भूमिकेला सेन्सॉर बोर्डाकडून विरोध होण्याची शक्यता आहे. कॅटरिना कैफ हिने ही भूमिका साकारली आहे. पण कदाचित झोयाच्या भूमिकेला सेन्सॉरचा क्लीअरन्स मिळणे इतके सोपे नाही.

सेन्सॉर बोर्डाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तूर्तास भारत-पाकिस्तान रोमान्स वा रिलेशनशिपवर अनऑफिशिअली बॅन आहे. तुम्हाला आठवत असेल तर करण जोहरच्या अलीकडे आलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात अनुष्का शर्माने साकारलेली अलिजेह पाकिस्तानी होती. पण सर्जिकल स्ट्राईकनंतर तिची ओळख बदलवून तिला लखनौतील भारतीय पाकिस्तानी दाखवण्यात आले होते. या बदलामागेही हेच कारण होते.
‘टायगर जिंदा है’मध्ये सलमान खान एका भारतीय एजंटच्या भूमिकेत आहे तर झोया पाकिस्नी गुप्तहेराच्या. पण दिग्दर्शकाने या दोघांमध्ये रोमान्स  दाखवला आहे. सूत्रांच्या मते, सेन्सॉर बोर्डाचा अशा क्रॉस बॉर्डर लव्ह स्टोरीवर आक्षेप आहे. त्यामुळे या चित्रपटास प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येऊ शकतात. अशात झोयाचे नागरिकत्व बदलणे किंवा चित्रपटातील रोमॅन्टिक दृश्यांना कात्री लावणे, असे दोन पर्याय ‘टायगर जिंदा है’च्या मेकर्सपुढे उरतात. रोमॅन्टिक दृश्यांना कात्री लावली तर चित्रपटाची कथा प्रभावित होऊ शकते. त्यामुळे सध्या तरी कॅटरिना साकारत असलेल्या झोया या भूमिकेचे राष्ट्रीयत्व बदलण्याचा एकच पर्याय उरतो. त्यामुळेच झोयाचे नागरिकत्व बदलू शकते का? असा प्रश्न सूत्रांना विचारण्यात आल्यावर, त्यांनी कदाचित असे होऊ शकते, असे उत्तर दिले.
गतवर्षी ऊरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांत काम करण्यास बंदी लादण्यात आली होती. ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात पाकी अभिनेता फवाद खान असल्यामुळे हा चित्रपट त्यावेळी बराच वादात सापडला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments