वरूण धवनला सेल्फी पडली महागात…

- Advertisement -

मुंबई – बॉलिवूड अभिनेता वरूण धवन याला मुंबई पोलिसांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. मुंबईच्या रस्त्यावर गाडीतून प्रवास करत असताना त्याने रिक्षातून प्रवास करणा-या एका फॅनसोबत सेल्फी काढला होता. सेल्फी काढतानाचा हा फोटो एका इंग्रजी वृत्तपत्राने छापला. तो फोटो ट्विट करून मुंबई पोलिसांनी वरूण धवनला झापलं आहे. या शिवाय त्याला इ-चालान देखील आकारण्यात आलं आहे. 

वरूण धवनचा एक सेल्फी एका वृत्तपत्राने छापला होता. यामध्ये तो भररस्त्यात आपल्या गाडीच्या खिडकीतून डोकावून बाजूच्या रिक्षातून प्रवास करणा-या एका आपल्या फॅनसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी हा फोटो ट्विट करून वरूणला खडेबोल सुनावले आहेत.

”हे धाडस सिनेमांपर्यंत ठिक आहे… पण मुंबईच्या रस्त्यांवर नाही. तू स्वतःचा , तुझ्या फॅनचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घातला… तुझ्यासारख्या तरूणाकडून आणि एका जबाबदार मुंबईकराकडून चांगली अपेक्षा असते. थोड्यावेळात  इ-चालान तुझ्या घरी पोहोचेलच…पण… पुढच्या वेळी आम्ही जास्त कठोर होऊ…” अशा शब्दांमध्ये मुंबई पोलिसांनी वरूण धवनला डोस दिला आहे.

- Advertisement -
- Advertisement -