Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी यांना पी. सावळाराम पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी यांना पी. सावळाराम पुरस्कार जाहीर

ठाणे – जेष्ठ सिनेनाटय अभिनेते सुधीर दळवी यांना जनकवी पी.सावळाराम तर आपल्या अभिनयाने सिनेनाटय क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या  जेष्ठ सिनेनाटय अभिनेत्री जयश्री टी. यांना या वर्षीच्या गंगा-जमुना पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली. दरम्यान प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव, प्रसिध्द साहित्यीक अरुण म्हात्रे, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामिगरी करणाऱ्या  आदर्श शिक्षिका माधुरी ताम्हणकर यांनाही जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने रविवार १७ डिसेंबर रोजी गौरविण्यात येणार आहे.

दरवर्षी ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्या वतीने संगीत, चित्रपट, साहित्य, नाटय, कला व शिक्षण क्षेत्रात अव्दितीय कामिगरी करणाऱ्या  गुणीजनांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. यावर्षी पुरस्काराचे हे १८ वे वर्ष आहे. हा पुरस्कार सोहळा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, विनय सहस्त्रबुध्दे, आमदार प्रताप सरनाईक, डॉ.जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, अ‍ॅड.निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जनकवी पी. सावळाराम कला समिती अध्यक्षा डॉ. कल्पना पाठारे आणि जनकवी पी. सावळाराम कला समिती चे प्रमुख विश्वस्त संजय सावळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्र होणार आहे.
मराठी रंगभूमीसह चित्रपटातून विशेषत: हिंदी चित्रपट, मालिका आणि विविध भाषांतील चित्रपटातही अभिनेते सुधीर दळवी यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. शिर्डी के साईबाबा या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. सुमारे ६० मराठी चित्रपट, २०० हून अधिक हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिका त्यांच्या नावावर जमा आहे. तर गेली दोन दशके लावणी क्षेत्रात भन्नाट नृत्य आणि अभिनय शैलीचा ठसा उमटवणाऱ्या अभिनत्री जयश्री टी. यांना यंदाचा गंगा जमुना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर अरुण म्हात्रे, (साहित्यिक), माधुरी ताम्हणकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील कामिगरीबद्दल आणि लक्षवेधी कलाकार म्हणून प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. १७ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments