Thursday, March 28, 2024
Homeमनोरंजनशोलेचा कालिया आज काळाच्या पडद्याआड

शोलेचा कालिया आज काळाच्या पडद्याआड

Vjiu Khote Kalia Sholay,Kalia,Sholay,Viju,Khoteमुंबई: हिंदी मराठीसह 300 चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. गावदेवी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. विजू खोटे यांच्या पार्थिवावर आज सोमवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अभिनेते विजू खोटे यांनी आपल्या अभिनयाने हिंदी-मराठी सिनेमा सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. मराठी रंगभूमीबरोबर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात दमदार भूमिका केल्या. भारतीय सिने इतिहासात विशेष नोंद केल्या गेलेल्या शोले सिनेमातील कालियाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली.

खोटे यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मराठीतील ‘या मालक’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या बिळावर नागोबा’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांनी असंख्य छोट्या भूमिका केल्या. अभिनय कौशल्य आणि अप्रतिम संवादफेक लाभलेल्या खोटे यांनी साकारलेल्या भूमिका दर्शकांच्या मनात कायम राहिल्या. विजू खोटे यांनी आपल्या कारकीर्दीला नायकाच्या भूमिकेपासून प्रारंभ केला होता. विजू खोटे यांच्या भूमिका नेहमी स्मरणात राहतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments