पुन्हा एकदा कपड्यांवरुन चर्चेत आली विद्या बालन

- Advertisement -

विद्या बालनचा तुम्हारी सुलुहा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. आपला सिनेमा चांगली कमाई करत आहे यामुळे सध्या विद्या भलतीच खूश आहे. याचाच आनंद साजरा करण्यासाठी ती पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लंच डेटला गेली होती. विद्या आणि सिद्धार्थ फार कमी वेळा एकत्र सार्वजनिक ठिकाणी दिसतात. नेहमीच साडीमध्ये दिसणारी विद्या या लंच डेटला काहीशी वेगळ्या गेटअपमध्ये दिसली. तिने निळ्या रंगाचा कुर्ता आणि त्याच रंगाची प्लाजो घातली होती. या कपड्यात ती फार सुंदर दिसत होती. एकमेकांचा हात हातात धरून हे देखणं कपल बाहेर पडताना साऱ्यांच्याच नजरा त्यांच्यावर होत्या.

सार्वजनिक ठिकाणी सिद्धार्थ आणि विद्या एकत्र येणे टाळतात. अनेक दिवसांनी या दोघांना एकत्र पाहिल्यामुळे या दोघांचे चाहते नक्कीच सुखावले असतील यात काही शंका नाही. विद्याही या लंच डेटमुळे सुखावलेली दिसते. या लंच डेटपेक्षा सर्वात जास्त चर्चा कशाची होत असेल तर ती तिच्या ड्रेसची होती. अनेकदा विद्याला साडीमध्येच पाहिले गेले आहे. त्यामुळे कुर्तीमध्येदेखील ती तेवढीच मादक दिसते हे तिने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

‘द डर्टी पिक्चर’मध्ये ‘उलाला उलाला’ म्हणत प्रेक्षकांना मोहित करणारी विद्या ‘तुम्हारी सुलू’मध्ये लेट नाइट रेडिओ शोमधून ‘हॅलो’ म्हणत प्रेक्षकांवर जादू करताना दिसते. सिनेमाने आतापर्यंत १६ कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीचे काम करायलाच मिळते असे नाही. मात्र, काहीजण याबाबतीत सुदैवी असतात. त्यांना ज्या गोष्टीचा छंद आहे तीच गोष्ट काम म्हणून करण्याची संधी मिळते. साहजिकच या कामातून त्यांना इतरांपेक्षा अधिक आनंद मिळतो, अशा मध्यवर्ती कल्पनेभोवती आधारित विद्या बालनचा ‘तुम्हारी सुलु’ हा सिनेमा सध्या प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

- Advertisement -
- Advertisement -