Thursday, March 28, 2024
Homeमनोरंजनसोनमच्या 'या' लेहंग्याची किंमत ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल!

सोनमच्या ‘या’ लेहंग्याची किंमत ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल!

आता लग्नसोहळ्यात इतर अभिनेत्रींच्या लग्नसोहळ्यांप्रमाणेच सोनमचाही थाट पाहायला मिळणार आहे.या लग्नसोहळ्यात सोनमचा लेहंग्याची जास्त चर्चा होताना दिसते.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपती आनंद आहुजा यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे.लग्नाआधी पार पडणा-या सर्व सोहळ्यात खास आकर्षण ठरलेल्या गोष्टींवर चर्चा होते.त्यात आणखीन एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली आहे. सोनमच्या संगीत सोहळ्यात विविध सेलिब्रिटी आणि मान्यवरांच्या स्टाइलचा जलवा पाहायला मिळाला.मनमोहक आणि तितक्याच ग्लॅमरस स्टाइलचे ड्रेस परिधान करत सा-यांनीच या सोहळ्याला चारचाँद लावले होते.प्रत्येकाची या सोहळ्यातील स्टाइल अन् अदा घायाळ करणारी अशीच होती. प्रत्येक कार्यक्रमात सोनम कपूचा अंदाज खूप खास पाहायला मिळाला. आज सोनम कपूर आनंद आहुजासह आपल्या आयुष्याची नव्याने सुरूवात करणार आहे. आज पार पडणा-या या लग्न सोहळ्यात प्रत्येक गोष्टीचा बारकाईने लक्ष देण्यात आले आहे. यांत सोनम कपूरच्या मेकअप,ड्रेसिंग सगळ्या गोष्टी खूप खास असणार आहेत. आतापर्यंत पार पडलेल्या कार्यक्रमात सोनमच्या आकर्षक लेहंग्यामुळे तिचे  सौंदर्य आणखी खुलून गेले होते. त्यामुळे आता लग्नसोहळ्यात इतर अभिनेत्रींच्या लग्नसोहळ्यांप्रमाणेच सोनमचाही थाट पाहायला मिळणार आहे. या लग्नसोहळ्यात सोनमचा लेहंग्याची जास्त चर्चा होताना दिसते. लग्नात सोनम परिधान करत असलेल्या लेहंग्याची किंमत ऐकून तुम्हीही चक्रावल्याशिवाय राहणार नाही. या डोळे दिपवणा-या आणि सगळ्यांना घायाळ करणा-या लेहंग्याची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. हा आकर्षक लेहंगा परिधान केल्यानंतर नक्कीच सोनमलाही ”ये मेरा लेहंगा बडा है मंहगा” या ओळीची आठवण झाल्या शिवाय राहणार नाही.

लग्नामुळे गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत राहिलेली सोनम कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनलेली आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन आठवड्यांपासून स्कोर ट्रेंड्सच्या लोकप्रियतेच्या चार्टवर नंबर वन स्थानी असलेल्या ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राला या आठवड्यात सोनम कपूरने मागे टाकले आहे. बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या स्कोर ट्रेंड्सच्या लिस्टमध्ये बिग बी अमिताभ बच्चन या आठवड्यात ७०.६८ अंकांनी प्रथम स्थानी आहेत तर दुसऱ्या स्थानावर सलमान खान आणि तिसऱ्या क्रमांकावर संजू चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे रणबीर कपूर आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषावर आधारित ही लिस्ट दिलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments