Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजनजरीन खानने लेस्बियन भूमिकेसाठी वाढवले वजन

जरीन खानने लेस्बियन भूमिकेसाठी वाढवले वजन

Zareen Khan, hum bhi akele tum bhi akele, lesbin role, zareen , weight gain, बॉलीवूडमध्ये अनेकदा चित्रपटाच्या पटकथानुसार अभिनेते, अभिनेत्र्यांना वजनं वाढावावा लागतो किंवा कमीही करावा लागत असतो. जरीन खान लवकरच रोमांस ड्रामा ‘हम भी अकेले तुम भी अकेले‘मध्ये दिसणार आहे. यात ती एका लेस्बियनची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी तिने एक-दोन नव्हे तर ५ ते ६ किलो वजन वाढवले आहे.

याबाबत जरीन म्हणाली, मी माझे पात्र मानसीच्या तयारीसाठी दिग्दर्शकांसोबत खूप बोलले त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून त्यांचा दृष्टिकोन पडद्यावर दाखवू शकेल. या चित्रपटासाठी मी वजनही वाढवले आहे. माझे जे पात्र आहे तिला खायला खूप आवडते. जाड दिसण्यासाठी मी आपला व्यायामही बंद केला आहे.

पुढे म्हणाली ‘मी जवळपास तीन महिन्यांपासून जिमलाच गेले नाही. भूमिकेसाठी वजन वाढवणे काही कठीण काम नव्हते. ते तर पटकन वाढते. तरीदेखील वजन वाढल्यामुळे मी खूप वाईट दिसेल इतके वजन वाढू नये याकडेही लक्ष दिले. भूमिकेसाठी वजन वाढवायचे म्हणून खूप जासत खाल्ले नाही. चित्रीकरणासाठी आम्ही धर्मशाळेत थांबलो होतो तेथे पराठेही खाल्ले. डाएट करताना जे पदार्थ खाता येत नव्हते तेदेखील मी खाल्ले. मी तेवढेच वजन वाढवले जे पडद्यावर चांगले दिसेल आणि नंतर वजन कमी करण्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत. मी जर व्यायाम केला नाही तर मला अस्वस्थ वाटते. मी आनंदी राहू शकत नाही.

सध्या बॉलिवूडमध्ये झीरो साइजची क्रेझ कमी झाली असे मला वाटते. परंतु काही दिग्दर्शकांना झीरो साइजच्याच मुली चित्रपटात हव्या असतात. ते त्यांच्या अभिनयाकडे लक्ष देत नाही तर फक्त अभिनेत्री किती बारीक आहे हेच पाहतात. त्या चांगला अभिनय करु शकतात की, नाही याकडे ते दुर्लक्ष करतात. मी कुणाचेही नाव घेणार नाही. असे बरेच दिगदर्शक-निर्माता आहेत जे अभिनेत्री बारीक आहे का हे पाहूनच तिला चित्रपटात घेतात. माझ्याबााबत सांगायचे झाले तर मी कोणत्याही भूमिकेसाठी वजन कमी करण्याची गरज पडली तर मी नक्की करेन असंही जरीन म्हणाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments