आजच्या घडामोडी

- Advertisement -

#NewsAlerts
1). रायगड – राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा रायगड जिल्ह्यातुन सुरुवात झाली पहिली पराभवाची सुरुवात रायगड मधील कर्जत विधानसभेतून झाली
कर्जत नगरपालिका नगरअध्यक्ष निवडणूक निकाल शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांचा 2000 पेक्षा जास्त मतानी विजय..!! आमदार सुरेश लाड यांच्या मुलीचा पराभव.

2). सातारा: मलकापुर निवडणुकीत काँग्रेस ला १४ तर भाजपाला ५ जागा
नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस च्या साै निलम येडगे विजयी

- Advertisement -

3). मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हदय प्रत्यारोपणासाठी मदत प्राप्त झालेल्या धनश्री मुजमुले हिच्या पालकांनी आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची जालना येथे भेट घेतली आणि आभार मानले.

4). मुंबई – मराठा आरक्षणा संदर्भातील याचिकांवर सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयात सुरुवात. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी 16 टक्के मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका मागे घेतली

5). मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल ‘जसाच्या तसा’ जाहीर करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

- Advertisement -