होम मुख्य बातम्या आजच्या घडामोडी

आजच्या घडामोडी

4
0

1). राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे (GATS-2) 2016-17 नुसार देशभरात महाराष्ट्रमध्ये धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणानुसार धूम्रपान करण्याचे प्रमाण 3.8 इतके असून ते अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. महाराष्ट्रात धूम्रपान 2.1 टक्क्याने आणि धुम्रविरहित तंबाखू सेवनात 3.1 टक्क्याने घट झाल्याचे आढळून आले आहे. ‘तंबाखू मुक्त शाळा’ अभियानांतर्गत 2 हजार 755 शाळा तंबाखू मुक्त करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

2). कोळीवाड्यांसाठी शिवसेना होणार आक्रमक

3). मुंबई – माहीम परिसरात फुटपाथवर झोपलेल्या  ५ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कारानंतर हत्या करणारा मेहंदी हसन मोहम्मद मुस्ताक शेख (२३) या आरोपीला माहीम पोलिसांनी केली अटक

4). पुतळ्यांवर खर्च केलेला जनतेचा पैसा परत करा; मायावतींना ‘सर्वोच्च’ धक्का

5). कॉफीच्या शोधकर्त्याला गुगलचा डूडलरुपी सलाम

6). Video: राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल; आठवलेंच्या कवितेनं लोकसभेत हशा

7). आई बापानं जमीन विकून शिकवलं; पोरानं यूपीएससी पास होत घरच्यांचं नाव काढलं

8). मुंबई: एसटी महामंडळाची ८,०२२ चालक तथा वाहक पदांची भरती; परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

9). मुंबई: शिवाजी पार्कवर १६-१७ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही; लाऊडस्पीकरला परवानगी देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

10). पुणे: राज्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेस आजपासून सुरुवात; ११ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार, १४ मार्च रोजी ऑनलाइन लॉटरी

11). अवैध गर्भपात: डॉ. मुंडे दाम्पत्याला १० वर्ष शिक्षा

12). व्हिडिओ: बाइकस्वारांना पत्ता सांगताना सावध राहा

13). राफेल: ‘बातमीमध्ये पर्रीकर यांचे उत्तर गाळले’

14). मराठा आरक्षण सुनावणी: मुंबई हायकोर्टात १४, १५ आणि २०, २१, २२ फेब्रुवारी रोजी होणार सुनावणी

15). अहमदनगर: ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात गणेश जयंती निमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी

16). कॅन्सर पीडितेसाठी देवदूत ठरला स्टेशन मास्तर

17). 8 दिवसात शिक्षक भरतीची जाहिरात काढणार : विनोद तावडे

18). शरद पवार माढ्यातून लढणार, मोहिते पाटलांचा पत्ता कट?

– लोकसभेच्या मैदानात उतरण्याचे शरद पवार यांचे संकेत

– माढा लोकसभेतून लढण्याबाबत विचार करू : शरद पवार

– माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटलांचा पत्ता कट होणार?

19). नाशिक-कल्याण लोकलच्या चाचणीला ब्रेक, चाचणीसाठी तीन महिने लागणार

20). अहमदनगर :  पुणतांब्यातील उपोषणकर्त्या मुलींची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

21). विधानसभा बरखास्त होणार नाही, अशोक चव्हाणांच्या भाकितावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर

22). अजित पवारांना पान खाऊ घालणाऱ्या टपरीवाल्याला अश्रू अनावर