Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआजच्या घडामोडी

आजच्या घडामोडी

#NewsAlerts
1). दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देणाऱ्यांचा मतदानाचा हक्क काढून घ्या’
योग गुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केले आहे. दोनपेक्षा अधिक मुलांना जन्माला घालणाऱ्यांचा मतदान अधिकार काढून घ्या, अशी मागणी बाबा रामदेव यांनी केली आहे.

2). मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कुर्ला-सायन स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा
-माटुंगा स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली आहे.

3). ठाणे: चहापावडरमध्ये रंग भेसळ; मुंब्र्यात छापा

4). बाळासाहेबांच्या स्मारकासाठी १०० कोटी; शोभा डेंचा विरोध

5). देशात पेपर पासपोर्ट हा प्रकार लवकरच इतिहास जमा होऊन त्याची जागा चिपवर आधारित ई-पासपोर्ट घेणार आहे.
वाचा सविस्तर…

6). देशातील बेरोजगारांसाठी खुशखबर, रेल्वेमध्ये लवकरच चार लाख कर्मचाऱ्यांसाठी भरती होणार, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची मोठी घोषणा

7). लवकरच शिवसेना-भाजपच्या युतीबाबत चर्चांना सुरुवात, सूत्रांची माहिती, भाजपच्या राज्य कार्यकारिणीआधी जागावाटपाच्या हालचालींना वेग

8). बारामती : शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. परंतु काँग्रेसने त्यांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली आहे. तरीदेखील पवार आज पुन्हा त्याच काँग्रेससोबत गेले, याची मला खंत वाटते. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बुधवारी मोदी यांनी बारामतीसह हिंगोली, नंदुरबार, नांदेड, गडचिरोली इथल्या भारतीय जनता पक्षाच्या बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

9). परळ टर्मिनसच्या कामांसाठी दोन दिवस ब्लॉक

10). ‘ठाकरे’च्या स्क्रीनिंगला वादाची डरकाळी घुमली

11). लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे होणार, एकत्र निवडणुकांच्या चर्चेवर पडदा, सूत्रांची माहिती

12). शिवसेना प्रस्ताव घ्यायला बसलेली नाही : संयज राऊत
शिवसेना मुंडावळ्या बांधून प्रपोजलची वाट बघत बसलेली नाही : संजय राऊत
कसला युतीचा प्रस्ताव? आमचा मॅरेज ब्युरो आहे का?: शिवसेना
लोक प्रियांकांमध्ये इंदिरा गांधींना पाहतील: शिवसेना

13). ‘ठाकरे’ चा वाद शिगेला, दिग्दर्शक म्हणतात बाळासाहेबांच्या प्रेमापोटी चित्रपट केला, कुणी कसं वागायचं हा त्यांच्या संस्काराचा प्रश्न तर निर्माते म्हणतात, लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की मोल नष्ट होते
-‘ठाकरे’ सिनेमा वाद: संजय राऊत स्वत:च्याच ट्विटमुळे झाले ट्रोल

14). : ‘द क्वीन ऑफ झासी’ सिनेमाच्या रिलिजचा मार्ग मोकळा. याचिकाकर्त्यांना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. सिनेमात चुकीचा इतिहास दाखवल्याविरोधात कोर्टात याचिका. निर्मात्यांना उत्तर देण्यासाठी हायकोर्टाकडून दोन आठवड्यांचा अवधी

15). मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि बसची धडक
टायर फुटून कार बसला धडकली
दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू, एक जखमी

16). मुंबईत ‘अंनिस’कडून १०१व्या महिलेची जटेतून मुक्तता.

17). पंढरपूर: रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

18). ICICI कर्ज घोटाळा प्रकरण: वेणूगोपाल धूत यांच्या मुंबई, औरंगाबाद कार्यालयावर सीबीआयचा छापा

19). गुजरात: काँग्रेसचे ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली

20). प्रियंकांचा उदय हा राहुल गांधींचा पराभव नव्हे, सचिन पायलट यांनी सुनावले
-मोतीलाल नेहरू ते प्रियंका गांधी… एकाच घराण्यातील 11 जण राजकारणात
-प्रियंका गांधींमुळे काँग्रेसला उभारी, पण घेता येईल का भरारी?
-राहुल गांधी इटलीत जा! अमेठीत शेतकऱ्यांची घोषणाबाजी

21). ‘…त्यापेक्षा 100 कोटी मला द्या’; बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला ‘शोभा डें’चा विरोध

22).,मुख्य निवडणूक आयुक्त ठाम, निवडणुकांमध्ये ईव्हीएमनेच मतदान

23). ‘राहुल गांधींनी आपण एकटे राजकारण करु शकत नाही मान्य केलं आहे’
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी प्रियंका गांधी एक चांगल्या महिला असल्याचं म्हटलं आहे

24). लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी स्वत:च्या मतदार संघात आलेल्या राहुल गांधींना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले

25). प्रियांकाच्या राजकारण प्रवेशावर काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
-प्रियांका गांधींना शुभेच्छा देत असतानाच प्रियांकाच्या आगमनामुळे भाजपवर काहीही परिणाम होणार नाही हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments