Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याभारतीय राजकारणातील डायनामाईट जाॅर्ज फर्नांडीस काळाआड

भारतीय राजकारणातील डायनामाईट जाॅर्ज फर्नांडीस काळाआड

 कामगार चळवळीचे पितामह ,भारताचे माजी संरक्षण मंत्री, ७०आणि ८०च्या दशकातील राजकारणातील एक डायनामिक बंडखोर व्यक्तिमत्व, डाव्या चळवळीमधील एक तडफदार नेते, जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

जॉर्ज फर्नांडिस यांच्या कारकीर्दीचा अल्पपरिचय :

जन्म 3 जून 1930 रोजी मंगलूर येथे जन्म,आई वडीलजॉन जोसेफ फर्नांडीस आणि एलिस मार्थ फर्नांडिस

१९५० पासून टॅक्सी ड्रायव्हर युनियनचे अध्यक्ष

१९६१ ते १९६८ पर्यंत मुंबई महानगरपालिका सदस्य

१९६७ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

ज्येष्ठ नेते स.का.पाटिल यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश

१९६९ मध्ये संयुक्त समाजवादी पक्षाचे सरचिटणीस म्हणून निवड.

स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे नेतृत्व

१९७३ मध्ये सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष

आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून तुरुंगवास

१९७७ मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत उद्योगमंत्री

जुलै १९७९ मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर

पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या मंत्रीमंडळातून राजीनामा

१९८४ च्या निवडणुकीत त्यांचा मंगलोर लोकसभा मतदारसंघातून पराभव

१९८९ मध्ये ते बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर  लोकसभेवर

संयुक्त आघाडी सरकारमध्ये रेल्वेमंत्री

१९९१ मध्ये मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलातर्फे विजयी

१९९४ मध्ये  नितीश कुमार आणि रवी रे या नेत्यांसोबत समता पक्षाची स्थापना

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाची भाजपबरोबर युती

१९९९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल नवा पक्ष

१९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये संरक्षणमंत्री

२००१ मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, त्यामुळे मार्च ते ऑक्टोबर मंत्रिमंडळाबाहेर

ऑक्टोबर २००१ ते २००४ मध्ये त्यांची परत संरक्षणमंत्रीपदी नेमणूक झाली

– निधन २९ जानेवारी २०१९

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments