Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याभंडारा जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव, दहा नवजात चिमुकल्यांचा मृत्यू

भंडारा जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव, दहा नवजात चिमुकल्यांचा मृत्यू

भंडारा : शनिवारी मध्यरात्री येथील जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा बालकांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला. तर 7 बालकांना सुखरूप वाचवण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

 सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग मध्यरात्री 2 वाजता सिक न्यूबॉर्न केअर यूनिट (SNCU)मध्ये लागली. युनिटमधील 7 बालकांना सुखरूप वाचवण्यात आले असून 10 बालकांचा मृत्यू झाला आहे.

बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आले. त्यानंतर नर्सने दार उघडून पाहिले असता सगळीकडे प्रचंड धूर दिसून आला. त्यानंतर धावपळ सुरु झाली आणि माहिती मिळताच अग्रिशामक दलाने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments