Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोनाचा थैमान थांबेना, महाराष्ट्रात 122 रूग्ण!

कोरोनाचा थैमान थांबेना, महाराष्ट्रात 122 रूग्ण!

122-coronavirus-patients-in-maharashtraमुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी भारत लॉकडाऊन करण्यात आला. तरी सुध्दा कोरोनाचा थैमान सुरुच आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 122 वर गेली आहे. त्यामुळे है थैमान कधी थांबेल अशी चिंता आता सर्वांनाच लागली आहे.

राज्यात सकाळी कोरोनाचे 5 रुग्ण आढळल्यानंतर आता मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 122 वर गेला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथल्या एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सकाळी समोर आली आहे. त्यातच आता मुंबईत आणखी 4 रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

  • मुंबई शहर आणि उपनगर – 51
  • पिंपरी चिंचवड मनपा – 12
  • पुणे मनपा – 19
  • नवी मुंबई – 5
  • कल्याण – 5
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 4
  • सांगली – 9
  • अहमदनगर – 3
  • ठाणे – 3
  • सातारा – 2
  • पनवेल- 1
  • उल्हासनगर – 1
  • औरंगाबाद – 1
  • रत्नागिरी – 1
  • वसई-विरार – 1
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments