सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे डान्स बारना खुली सूट नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया

0
77

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने डान्स बार प्रकरणी दिलेला निकाल म्हणजे खुली आणि धडधडीत सूट नाही, राज्य सरकारने तयार केलेल्या काही नियमांच्याअधीन राहूनच डान्स बारना परवानगी देण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या चौकटीतच राहून डान्स बारमध्ये गैरप्रकार होऊ नये, यासाठी सरकार आवश्यक ती खबरदारी घेईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिली आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर याबाबत बोलताना श्रीमती रहाटकर म्हणाल्या कि, सर्वोच्च न्यायालयात राज्यातील डान्स बार बंदीबाबत दिलेला निर्णय आमच्या अपेक्षेप्रमाणे नाही. राज्य सरकारने २००६ ते २०१६ पर्यंत तीन कायदे केले; कारण ती जनभावना होती. डान्स बारच्या नादी लागून अनेक कुटुबांची वाताहत झालेली आपण पाहिली आहे. जनतेच्या भावनांचे प्रतिबिंब सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामध्ये होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अपेक्षेबरहुकूम नाही. पण तरीही तो मान्य करावा लागेल, त्याचा आदर करावा लागेल.

- Advertisement -

आजच्या निर्णयात डान्स बारना परवानगी देण्यात आली असली तरी त्यात न्यायालयाने शासनाने घातलेल्या काही अटी, शर्ती कायम ठेवल्या आहेत. डान्स बारमध्ये अश्लीलतेला कोणतंही स्थान असणार नाही, डान्सबार मालक आणि नर्तिका यांच्यात करार झाला पाहिजे, डान्स बार सायंकाळी सहा ते रात्री साडेअकरा या वेळेतच सुरू राहतील, तिथे काम करणाऱ्या महिलांचे शोषण होता कामा नये, पैसे उधळण्यास मनाई अशा राज्य सरकारच्या अटी न्यायालयाने मान्य केल्या आहेत. डान्स बारच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही, तेथील कर्मचाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणे अशा नियमांच्या अधीन राहूनच न्यायालयाने डान्स बारना परवानगी दिली असल्याकडे श्रीमती रहाटकर यांनी लक्ष वेधले.

(डान्स बार उघडायला परवानगी देणारा निर्णय दुर्दैवी सरकार चे मोठे अपयश सौदेबाजी झाली बाजू मांडली गेली नाही)

(राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर फेरविचार करून पुन्हा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आ. विद्या चव्हाण)

(राज्य में डांस बारों को लेकर सुप्रीम कोर्ट के फैसले के आधार पर शिवसेना के उप-नेता और प्रवक्ता, विधायक डाॅ. नीलम गोऱ्हे की प्रतिक्रिया)

(डान्सबारबाबत चा निर्णय दुर्भाग्यपुर्ण,डान्सबार समाजासाठी घातकचं हजारो कुटुंबाचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचवायला तरूणाईला व्यसनाधीनतेपासून रोखण्यासाठी हि कीड ठेचून काढायचे काम आरआर आबांनी केलेलं)

- Advertisement -