Friday, March 29, 2024
Homeमुख्य बातम्याआजच्या घडामोडी

आजच्या घडामोडी

#NewsAlerts
1). अंधेरीतील मरोल नाका पाईपलाईन परिसरात दोन मजली इमारत कोसळली, मुकुंद हॉस्पिटल जवळील घटना, खोदकाम सुरु असताना मशीनचा हादरा बसून इमारत कोसळ्याचं स्थानिकांचा दावा

2). – दिल्ली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
– नवी दिल्लीत स्वामिनाथन आयोग लागू होणार
– स्वामिनाथन आयोग लागू करणारे दिल्ली पहिले राज्य

3). कॉ. पानसरे हत्या प्रकरणात पुढील आठवड्यात आरोपपत्र दाखल करणार, एसआयटीची मुंबई उच्च न्यायालयात माहिती, पश्चिम बंगालमध्ये सीबीआयसोबत घडलेल्या प्रसंगावरून हायकोर्टाची नाराजी

4). नागपुरातील वन्य जीव बचाव केंद्रातच बिबट्याकडून नऊ प्राण्यांची शिकार, पाच मीटर उंच पिंजरा ओलांडून चितळ-काळवीटांना संपवलं

5). मुंबई : कोस्टल रोडच्या कामासाठी वरळीतील कोळी बांधवांना मासेमारीला मज्जाव,
मासेमारी न करण्यास सांगत बोटी हटवल्याने कोळी बांधव आक्रमक, एचसीसी आणि एल अँन्ड टी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून कोस्टल रोडचं सर्वेक्षण, मात्र मच्छिमारांनी बोटीतूनच काळे झेंडे दाखवले

6). शेतकरी पेन्शन योजनेसाठी जिल्हा प्रशासन कामाला, उद्यापासून 15 फेब्रुवारीपर्यंत विशेष कॅम्प राबवणार, 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान हरकती स्वीकारणार, 20 फेब्रुवारीनंतर अहवाल केंद्राला पाठवणार, जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

7). सीबीआय वादावर ट्विट; प्रशांत भूषण गोत्यात

8). अहमदनगर: देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक

9). अहमदनगर: आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

10). महाराष्ट्रातील 4 कलाकारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 6 फेब्रुवारी 2019 रोजी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

11). रात्रीस खेळ चाले’या मालिकेत जसे अण्णा शेवंतावर लट्टू झालेले दाखवले आहेत तशीच तरुणाईमध्ये देखील शेवंताच्या किलर लूकवर फिदा झाली आहे. ही शेवंता नक्की कोण हे शोधण्यात अनेकजण गुंतले आहेत…

12). राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वाचा सविस्तर…

13). पवई येथील आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांनी कचरा डेपोमध्ये कचऱयातून झिरपणाऱया पाण्याद्वारे वीजनिर्मिती करण्याची किमया केली आहे. यामुळे प्रदूषणही कमी होईल आणि वीजनिर्मितीही करता येईल.

14). निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला रायगडमध्ये मोठा धक्का

15). मनी लॉड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांची चौकशी होणार, प्रियंका गांधींसोबत रॉबर्ट वाड्रा ईडी कार्यालयात दाखल

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments