Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रधुळेदणका : मनपाचे १६५ नगरसेवक तीन वर्ष निवडणूक लढवण्यास अपात्र!

दणका : मनपाचे १६५ नगरसेवक तीन वर्ष निवडणूक लढवण्यास अपात्र!

Dhule Mahanagarpalika,Dhule, Mahanagarpalika,BMC,MANPAधुळे : २०१८ मधील महापालिका निवडणुकीच्या खर्चाचा तपशील सादर न केल्याने नगरसेवकांसह एका आमदाराला चांगलाच दणका बसला आहे. तब्बल १६४ उमेदवारांना पुढील तीन वर्षे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यास अपात्र  ठरवण्यात आलं आहे.

नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी ही कारवाई केली. त्यात धुळे शहराचे एमआयएमचे विद्यमान आमदार फारुख शहा, तसेच भाजपाचे स्वीकृत नगरसेवक सोनल शिंदे यांसह काही माजी नगरसेवकांचादेखील समावेश आहे. ही अपात्रता आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२० पासून लागू असेल. ६ फेब्रुवारी २०२० रोजी हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

१६७ उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही

धुळे महानगरपालिकेची निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली. यासाठी ३५६ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा तपशील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्यात सादर करायचा होता. त्यानुसार १६७ उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही. या उमेदवारांना नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे नोटीस बजावून खुलासा सादर करण्याची मुदत दिली होती. त्यासाठी वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली. यात १६४ जणांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे आढळून आले. त्यामुळे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी मनपा कलम १० (१ ई) अन्वये १६४ जणांवर अपात्रतेची कारवाई केली. हे सर्वजण तीन वर्षासाठी महापालिकेची निवडणूक लढवू शकणार नाहीत.

धुळे महानगरपालिका निवडणुकीत विद्यमान आमदार फारुख शहा यांनी प्रभाग क्रमांक १३ अ मधून निवडणूक लढवली होती.  मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर भाजपाचे सोनल शिंदे हे सध्या स्वीकृत नगरसेवक आहे. अपात्रतेची कारवाई झालेल्यांमध्ये तत्कालिन महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती माधुरी अजळकर, माजी सभागृह नेता अरशद शेख,  माजी नगरसेवक रमेश बोरसे यांच्यासह इतरांचा यात समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments